बीड- शासकीय कर्मचाऱ्यास मारहाण करून कामात अडथळा आणल्याच्या प्रकरणात बीडचे माजी न प उपाध्यक्ष फारूक पटेल यांना दोन वर्षांची शिक्षा न्यायालयाने ठोठावली, या प्रकरणात पटेल यांची 15 हजाराच्या जात मुचलक्यावर जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
2015 साली शहरातील वनविभागाच्या जागेवर असलेल्या नगर पालिकेच्या गाळ्यामध्ये असलेल्या एका संस्थेच्या कार्यालयात तोडफोड केली जात असताना फारूक पटेल आणि इतरांनी त्यास विरोध केला होता.या प्रकरणात वनपाल सखाराम कदम यांच्या फिर्यादीवरून पटेल आणि अन्य एका विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
या प्रकरणी बीडचे जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत महाजन यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यांनी पटेल आणि जकीरोद्दीन सिद्दीकी या दोघांना दोन वर्षे शिक्षा आणि प्रत्येकी दीड हजार रुपये दंड ठोठावला. या प्रकरणी पटेल यांनी जामीन साठी अर्ज दिल्यानंतर 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.