December 10, 2022

केजची निवडणूक कमळाशिवाय – धनंजय मुंडे !

केजची निवडणूक कमळाशिवाय – धनंजय मुंडे !

केज – केज नगर पंचायत ची निवडणूक कमळ शिवाय होते आहे हे कुणीतरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सांगा अस म्हणत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले.वंचितांना न्याय देण्याचं काम मी माझ्या खात्यामार्फत करतो आहे,मात्र या खात्याला कमी लेखणे म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्यासारखे आहे असे मंत्री मुंडे म्हणाले.

माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी एका प्रचारसभेत बोलताना सामाजिक न्याय हे 32 नंबरचे खाते असून, या खात्याचा मंत्री लोकांना काही देऊ शकत नसतो, अशा आशयाचे वक्तव्य करत एकप्रकारे सामाजिक न्याय विभागाला कमी लेखले होते, याचाच संदर्भ घेऊन धनंजय मुंडे यांनी पंकजाताईंच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.

‘आम्हाला कुणी नाव ठेवत आहे, आमची कुवत काढली जात आहे, आम्ही गरीब माणसं आहोत, पण ज्यांनी पूर्वी 4-4 खाती सांभाळली तरी जनतेने त्यांना 32 हजाराने नाकारले त्यांची कुवत काय असावी; त्यांनी आमची कुवत विचारणे निव्वळ हास्यास्पद आहे, असा खोचक टोला देखील धनंजय मुंडे यांनी लगावला.

केज नगरपंचायत कमळ शिवाय

केज नगर पंचायत निवडणुकीत विरोधी पक्षांची अजब युती असून, इथे भाजप आमदार, भाजप खासदार, राष्ट्रीय नेते असूनही केज नगर पंचायत निवडणुकीत भाजपचा कमळ चिन्ह असलेला एकही उमेदवार रिंगणात नाही, हे महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या पर्यंत कुणीतरी पोहचवा, अशी मिश्किल टिप्पणी धनंजय मुंडे यांनी केली.

केज नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व शेतकरी कामगार पक्ष आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली केज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात झालेल्या जाहीर सभेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.

यावेळी मा. आ. पृथ्वीराज साठे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, ज्येष्ठ नेते बहादूर पाटील, राजकिशोर मोदी, बबन लोमटे, सौ. संगीताताई तुपसागर, शेकापचे भाई मोहन गुंड यांसह मान्यवर व सर्व उमेदवार उपस्थित होते.

आकडेवारी सांगू का?

दरम्यान 32 नंबर वाले 100 कोटी देतो म्हणून घोषणा करत आहेत अशा आशयाची टीका करणा-या माजी मंत्री आणि खासदार ताई अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना मदत मागायला पुढे का आल्या नाही, असा सवाल उपस्थित केला. तसेच यावेळी त्यांनी अतिवृष्टी अनुदानापोटी जिल्ह्यात मिळालेले 502 कोटी रुपये, सोयाबीन अग्रीम 25% विम्याचे 192 कोटी रुपये तसेच सध्या सुरू असलेल्या खरीप 2021 च्या पीकविमा वाटपाची आकडेवारीच जाहीर सभेत सांगितली.

आम्ही शब्द देतो आणि दिलेला प्रत्येक शब्द पाळतो, केज नगर पंचायतीच्या माध्यमातून ऐतिहासिक असलेल्या केज शहराच्या सर्वांगीण विकासाचा शब्द देतो, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click