बीड – पोलिसांशी तोडीपाणी करत आपला गुटख्याचा धंदा बिनबोभाटपणे करणारा महारुद्र उर्फ आबा मुळे अखेर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.बीड जिल्ह्यात जवळपास चार ते पाच ठिकाणी गुन्हे दाखल झाले तरी मुळे आबा चा गुटखा तस्करी चा धंदा सुरूच होता.शेवटी कागदोपत्री का होईना अटक दाखवायची म्हणून पोलीसांच्या पथकाने त्याला अटक केली .
बीड जिल्ह्यात पोलिसांच्या आशीर्वादाने शिवसेनेच्या माजी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे पासून ते सगळेच राजकीय कार्यकर्ते गुटख्याच्या तस्करीत सामील असल्याचे अनेकवेळा उघड झाले आहे.गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला हा धंदा आजही सुरूच आहे.
महारुद्र उर्फ आबा मुळे हा यातला पडद्यासमोरील कलाकार मात्र पडद्यामागे अनेक दिगग्ज आहेत,अन हे सगळं पोलिसांच्या सहमतीने होत हे वेगळं सांगायला नको.काही दिवसांपूर्वी प्रशिक्षणार्थी अप्पर अधिक्षक कुमावत यांनी गुटख्याच्या गोदामावर छापे मारले.हा सगळा माल आबा मुळे चा असल्याचं समोर आलं अन त्याच्यावर गुन्हा देखील झाला.
मात्र पोलीस दप्तरी फरार राहून स्वतःच्या बंगल्याचे बांधकाम उरकणारा आबा मुळे अखेर पोलिसांनी ताब्यात घेतला.त्याने म्हणे 14 ते 15 सिमकार्ड बदलले, पुण्य मुंबईत राहिला अखेर त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.