बीड – शहरातील मध्यवर्ती बसस्थानकासमोर असलेल्या एच डी एफ सी बँकेसमोर एका 24 वर्षीय युवकाचा तलवारीचे वार करून खून करण्यात आला. खासबाग भागात राहणाऱ्या या युवकावर तीन ते चार जणांनी हा हल्ला केला.या मागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही .
एच डी एफ सी बँकेसमोर शेख शाहिद शेख सत्तार हा 24 वर्षीय तरुण दुपारी चार वाजता उभा होता.त्यावेळी अज्ञात तीन ते चार तरुण हातात तलवारी अन चाकु घेऊन आले,त्यांनी शाहिद वर सपासप वार केले.
या हल्यामुळे शाहिद जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र त्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच जिल्हा रुग्णालयात एकच गर्दी झाली होती .