बीड – जिल्हा रुग्णालयात स्टोर किपर असणाऱ्या ठाकर आणि रियाज यांची सरकारी पैशावर ऐश सुरू आहे.गुत्तेदार बांगर,जायभाये,बाजीराव यांची बिले काढण्यासाठी ठाकर हा बिल घेऊन पुण्याला जाऊन सह्या घेऊन आला.रुग्णालयाचे सीईओ कुलकर्णी हे पुण्यात असले तरी महिन्यातून एक दोन वेळा बीडला येतात तरीसुद्धा ठाकर अन रियाज हे गुत्तेदारांची बिले काढण्यासाठी पुण्याला जाऊन आले.हा खटाटोप केवळ मर्जीतले गुत्तेदार सांभाळण्यासाठी अन टक्केवारी मिळावी यासाठी आहे.
बीड जिल्हा रुग्णालयात गेल्या वर्ष दोन वर्षात जवळपास दीडशे ते दोनशे कोटींची कामे झाली.यातील बहुतांश कामे ही गणेश बांगर,राजरतन जायभाये, अजिनाथ मुंडे,ठाकर आणि रियाज यांनी मिळून केली.आजघडीला देखील या गुत्तेदारांचा रुग्णालयात सुळसुळाट सुरू आहे.
जिल्हा रुग्णालयात औषध असो की कोणतीही खरेदी या चार पाच जणांना विचारल्याशिवाय काहीच होत नाही.सध्या यातील बहुतांश कामांची देयके काढण्याचा सपाटा सुरू आहे.या देयकांवर रुग्णालयाचे सीईओ कुलकर्णी यांच्या सह्या लागतात.
मात्र कुलकर्णी हे पुण्यात डेपोदेशन वर आहेत.ते महिन्यातून एक दोन वेळा बीडला येतात,महत्वाच्या कामावर साह्य करतात अन पुन्हा जातात.अस असताना देखील ठाकर अन रियाज हे दोघे चार दिवसांपूर्वी सरकारी खर्चाने पुण्याला गेले अन त्यांना पोसणाऱ्या गुत्तेदारांची बिले काढण्याचा प्रयत्न केला.
या सगळ्या गोष्टी माहीत असूनदेखील सीएस डॉ सुरेश साबळे हे का गप्प आहेत हे न उलगडणारे कोडे आहे.