बीड – आपल्या पक्षाच्या नेत्याच्या वाढदिवसाला भले मोठे बॅनर लावून चमकोगिरी करणाऱ्या पुढाऱ्यांना बीडचे आ संदिप क्षीरसागर यांनी आपल्या उपक्रमातून नेत्यांचा वाढदिवस कसा करावा हे दाखवून दिले आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने बीडमध्ये दिव्यांग व्यक्तींना व्हीलचेयर वाटप करत खऱ्या अर्थाने आधार देण्याचं काम आ क्षीरसागर यांनी केलं आहे.
देशाचे माजी कृषी मंत्री पद्मविभुषण खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने बीडमध्ये आ.संदिप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. दिव्यांग बांधवांना मोफत व्हिल चेअर व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले.
खा. पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या मुंबई येथील अभिष्टचिंतन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण बीडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात भव्य एलईडी वॉलवरून पहायला मिळाले. यावेळी आ.संदिप भैय्या क्षीरसागर, माजी आ.सय्यद सलिम, माजी आ.सुनिल धांडे, माजी आ.उषाताई दराडे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अॅड.डी.बी.बागल, रेखाताई क्षीरसागर यांची विशेष उपस्थिती होती.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात या थेट प्रक्षेपण सोहळ्यास बीड मतदार संघातील कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच यावेळी अॅड.प्रज्ञाताई खोसरे, अॅड.हेमाताई पिंपळे, महिला जिल्हाध्यक्षा संगिताताई तुपसागर, जिल्हा उपाध्यक्ष बबन गवते, वैजीनाथ तांदळे, मदन जाधव, अॅड.बाळासाहेब कोल्हे, विद्याताई जाधव, सेवादलाचे शेख पाशाभाई, तालुकाध्यक्ष महादेव उबाळे, शहराध्यक्ष बाळासाहेब गुजर, नंदु कुटे यांच्यासह वकील, डॉक्टर, पत्रकार बांधव यांची विशेष उपस्थिती होती.