परळी – परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मतदारसंघातील 200 विधवा महिलांना खा. शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मोफत पिठाच्या गिरणीचे वाटप करण्यात आले. यावेळी रोजगाराची संधी उपलब्ध झाल्याने महिलांच्या चेहऱ्यावर समाधान उमटलेले पाहायला मिळाले.
उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 15 जुलै ते 22 जुलै दरम्यान आयोजित सेवा सप्ताहात या महिलांची नाव नोंदणी करण्यात आली होती व आज खा. पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला या 200 महिलांना ना. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली व हस्ते तसेच नगर परिषद गटनेते वाल्मिक कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पिठाच्या गिरणीचे वाटप करण्यात आले.
याच कार्यक्रमात राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतील 7 लाभार्थींना प्रत्येकी 20 हजार रुपयांच्या धनादेशाचे वितरण देखील ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.