February 2, 2023

रक्तदात्यांचे अनुदान अधिकारी, कर्मचाऱ्यांनी खाल्ले !

रक्तदात्यांचे अनुदान अधिकारी, कर्मचाऱ्यांनी खाल्ले !

बीड – जिल्हा रुग्णालयात जी रक्तपेढी आहे त्या ठिकाणी किती अंदाधुंद कारभार आहे याचा एक नमुना आम्ही आज सादर करत आहोत.ज्या काही सामाजिक संस्था रक्तदान शिबिर आयोजित करतात त्यांना प्रति डोनर वीस रुपये अनुदान द्यावे किंवा खर्च करावा अशा सूचना आहेत,मात्र रक्तपेढी मधील अधिकारी अन कर्मचारी हे अनुदान संस्थांना न देता स्वतःच उचलून खिशात घालत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.डॉ बांगर आणि डॉ गवते यांच्या या प्रकाराकडे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे हे लक्ष देतील का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बीड जिल्हा रुग्णालयात किंवा इतरही रुग्णालयात जी रक्तपेढी आहे त्या ठिकाणी रक्तसंकलन आणि रक्त वितरण केले जाते.जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्थांना रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन जिल्हा रुग्णालय,जिल्हा प्रशासनामार्फत नेहमी केले जाते.

गेल्या दहा वीस वर्षांपासून शेकडो संस्थांनी रक्तदान शिबिर आयोजित करून हजारो रक्त पिशव्या संकलित केल्या गेल्या.प्रत्येक रक्तदान करणाऱ्या व्यक्तीला वीस रुपये अनुदान अथवा खर्च करावा असे आदेश आहेत.मात्र बीडच्या जिल्हा रुग्णालयात असे कुठलेच अनुदान रक्तदात्याला दिले जात नसल्याचे समोर आले आहे.

बीड जिल्हा रुग्णालयात असलेल्या रक्तपेढीच्या प्रमुख डॉ बांगर मॅडम आणि डॉ गवते यांच्या माध्यमातून या ठिकाणी नोकरीस असलेले येवले,खेडकर,गालफाडे, गणेश बांगर,शेख,म्हात्रे,हावळे, सुकाळे, केकान या कर्मचाऱ्यांनी एक रुपया देखील या रक्तदात्याना दिलेला नाही.

हे जे अनुदान आहे ते बांगर मॅडम,गवते आणि इतर कर्मचारी स्वतःच्या नावावर चेक द्वारे स्वतःच्या अकाउंट वर जमा करून घेतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.हा सगळा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून बिनबोभाटपणे सुरू आहे.याकडे कोणत्याही जिल्हा शल्य चिकित्सक यांनी लक्ष दिले नाही.

गेल्या वीस पंचवीस वर्षात हजारो रक्तदात्यांनी रक्तदान करून हजारो रुग्णांचे प्राण वाचवले आहेत.मात्र त्यांच्या नावावर आलेले अनुदान रक्तपेढीच्या अधिकारी अन कर्मचारी यांनी स्वतःच्या खिशात घातले आहे.विद्यमान सीएस डॉ सुरेश साबळे यांनी या सर्व प्रकाराची चौकशी करून दोषींचे अकाउंट चेक करावेत,ठराविक कालावधी नंतर या पैकी बहुतांश कर्मचाऱ्यांच्या नावावर त्यांच्या अकाउंट मध्ये हजारो रुपये जमा झाल्याचे समोर येईल.

सीएस साबळे या सर्व प्रकाराकडे लक्ष देतात का अन दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click