बीड- जिल्ह्यात गेल्या तीन चार महिन्यापासून एक आकड्यावर असलेली कोरोना रुग्णांची संख्या शुक्रवारी अचानक 23 वर जाऊन पोहचली.वडवणी तालुक्यात एकाच दिवशी तब्बल 16 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हे सर्वजण नगर येथे डोळ्यांचे ऑपरेशन करण्यासाठी निघाले होते हे विशेष .

बीड जिल्ह्यातील 1285 रुग्णांची तपासणी केली असता त्यात 23 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.प्राप्त अहवालानुसार आष्टी 2,बीड 3,केज आणि माजलगाव मध्ये प्रत्येकी 1 आणि वडवणी तालुक्यातील 16 रुग्णांचा समावेश आहे.
वडवणी तालुक्यातील जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत ते डोळ्यांचे ऑपरेशन करण्यासाठी अहमदनगर येथे निघाले होते.त्यांची आरटीपीसीआर चाचणी बीड जिल्हा रुग्णालयात केली असता धक्कादायक बाब समोर आली.20 रुग्णांपैकी तब्बल 16 जण पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे.