August 9, 2022

सीएस साहेब रक्तपेढी कड लक्ष द्या ! काम न करता बांगर ने पगार उचलला !

सीएस साहेब रक्तपेढी कड लक्ष द्या ! काम न करता बांगर ने पगार उचलला !

बीड- जिल्हा रुग्णालयाचा कारभार म्हणजे आंधळं दळतंय अन कुत्र पीठ खातय असा झाला आहे.रक्तपेढी मध्ये नोकरीस असलेला अन काही दिवसांपूर्वी राजीनामा दिलेला गणेश बांगर हा गेल्या दीड दोन वर्षात एकदाही कार्यालयाकडे फिरकला नाही,तरीही त्याचा पगार काढला गेला.सीएस साबळे साहेब बांगर शासनाचा जावई आहे का?त्याचा पगार काढताना त्याने काय काम केले,कधी हजर होता हे जरा सीसीटीव्ही तपासून एकदा पाहून घ्या अन त्याच्या पगाराची वसुली करा अशी मागणी होत आहे.

बीड जिल्हा रुग्णालयात अंदाधुंद कारभार गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे.तत्कालीन स्टोर किपर अजिनाथ मुंडे,रियाज,गणेश बांगर आणि राजरतन जायभाये यांनी रुग्णालयात कोट्यवधी रुपयांची खरेदी केली.हे सगळे कर्मचारी असताना यांना खरेदी करता येते का?या सगळ्यांना ज्या बांगर मॅडम यांचा आशीर्वाद आहे त्यांनी स्वतःचा भाऊ गेल्या दीड दोन वर्षात एकदाही कामावर हजर नसताना त्याचा पगार कसकाय काढला याची कोणी चौकशी करणार आहे का?

रक्तपेढी मध्ये गणेश बांगर याच्यावर काय जबाबदारी होती,त्याने किती रक्तदान शिबिरात काम केले,त्याच्या सह्या मस्टर वर आहेत तर तो कार्यालयात काम करताना सीसीटीव्ही मध्ये कसकाय दिसतं नाही. जर तो कर्मचारी आहे तर त्याने स्वतःच्या एजन्सी वर कसकाय कोट्यवधी रुपयांची खरेदी केली.

जिल्हा रुग्णालयात नव्याने रुजू झालेले सीएस डॉ सुरेश साबळे हे शिस्तीचे म्हणून परिचित आहेत.त्यामुळे त्यांनी रक्तपेढी मधील मागील दोन वर्षाचे सीसीटीव्ही फुटेज तपासून पहावे, जर बांगर हजर नसेल तर त्याला दिलेला पगार वसूल करण्याची कारवाई डॉ साबळे करणार का?एवढी हिम्मत ते दाखवणार का,असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click