बीड – आईच्या नावावर असलेल्या जमिनीवरील शेरा बदलण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या गेवराई येथील भूमिअभिलेख कार्यालयातील भूमापक असद पठाण याच्यासह एका झेरॉक्स चालकाला एसीबीच्या पथकाने अटक केली.
गेवराई येथील तक्रारदार याच्या आईच्या नावावर असलेल्या जमिनीवर पडीक असा असलेला शेरा बदलण्यासाठी भूमिअभिलेख कार्यालयात अनेकवेळा पाठपुरावा केला, मात्र कार्यालयातील भूमापक असदखान पठाण याने एक हजार रुपयांची मागणी केली होती.
तक्रारीची खात्री पटल्यानंतर एसीबीच्या पथकाने उपअधीक्षक भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी सायंकाळी झेरॉक्स चालक मयूर कडूदास कांबळे याला एक हजार रुपये लाच स्वीकारताना अटक केली.यावेळी पोलिसांनी पठाण यालादेखील ताब्यात घेतले.