बीड – जिल्हा परिषद मधील दादागिरी ला कंटाळून प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी हे पंधरा दिवसाच्या रजेवर गेले आहेत .कुलकर्णी यांना दहा बारा दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जी प उपाध्यक्ष यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याने ते अस्वस्थ होते .
बीड जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा मनमानी कारभार एवढा वाढला आहे की अधिकारी वैतागले आहेत.शिक्षण विभाग असो की बांधकाम अथवा पाणीपुरवठा प्रत्येक विभागात पदाधिकारी यांची दादागिरी वाढली आहे.याकडे पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे यांचे देखील लक्ष नाही.त्यामुळे बीडमध्ये नोकरी करण्यास बहुतांश अधिकारी तयार नसतात .
दहा बारा दिवसांपूर्वी प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांना शिक्षकांचे समायोजन करण्याच्या कारणावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जी प उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी शिवीगाळ करत अंगावर धावून गेले होते.
या प्रकारानंतर कुलकर्णी हे नातेवाईकाच्या मुलीच्या लग्नाला जाऊन परत आले.मात्र काम करण्यात अडचणी आणल्या जाऊ लागल्याने कुलकर्णी हे अखेर मंगळवारी रजा टाकून निघून गेले आहेत.