बीड – जिल्हा रुग्णालयात अजिनाथ मुंडे ची बदली झाल्यानंतर रुजू झालेला स्टोर किपर ठाकर आणि दुसरा स्टोर किपर रियाज यांचे लाड करायला या दोघांनी नवा बाजीराव धरला. या बाजीराव ने या दोघांचे चांगलेच लाड केले.त्याबदल्यात ऑक्सिजन प्लांट चे इंस्टोलेशन असो की इतर पुरवठा या दोघांनी बाजीराव ला काहीच कमी पडू दिल नाही .
बीड जिल्हा रुग्णालयात गेल्या दीड दोन वर्षात कोविड च्या नावाखाली अंदाधुंद कारभार झाला .या सगळ्यांचे आता सुरस किस्से समोर येत आहेत.गणेश बांगर,अजिनाथ मुंडे अन राजरतन जायभाये या तिघांनी रुग्णालय लुटून खाल्लं.त्यामुळे आता तिथं आलेल्या लोकांना काय करावं हे सुचेना झालं.
अशावेळी ठाकर आणि रियाज या दोघांनी मिळून एक बाजीराव धरला.हा बाजीराव म्हणे एका मंत्र्यांचा जवळचा आहे.त्याच्यासाठी मंत्र्यांचे पीएस वैगेरे फोन करतात अस हा सांगत असतो.या माध्यमातून या बाजीराव ने कोट्यवधी रुपयांची कामे मिळवली.
जिल्हा रुग्णालयात जो नवीन ऑक्सिजन प्लांट बसवण्यात आला आहे त्याचे काम देखील या बाजीराव ने मिळवून दिल्याची चर्चा आहे,या बाजीराव ने रियाज अन ठाकर या दोघांना हाताशी धरून कोट्यवधी रुपये छापले आहेत.नव्याने आलेल्या सीएस सुरेश साबळे यांना अंधारात ठेवून या बाजीराव चा हा कारभार सुरू आहे.ठाकर अन रियाज यांच्या या कारभाराला डॉ साबळे वेसण घालणार का,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.