बीड – जिल्हा रुग्णालयात खरेदी विक्री आणि पुरवठा या प्रक्रियेत बडतर्फ झालेले,बदली झालेले,कंत्राट संपलेले कर्मचारी आघाडीवर आहेत.जायभाये,कुलकर्णी, मुंडे,ठाकर आणि बांगर या सर्वांनी रुग्णालयात मनमानी कारभार सुरू केला आहे.विशेष म्हणजे या सगळ्यांना परळीकरांचा आशीर्वाद असल्याची देखील चर्चा आहे.सीएस,एसीएस यांची आळीमिळी गुपचिळी हा देखील चर्चेचा विषय ठरला आहे.
बीड जिल्हा रुग्णालयात अंदाधुंदी कारभार कशा पद्धतीने सुरू आहे याचे अनेक किस्से आता समोर येत आहेत.बोगस स्वातंत्र्य सैनिकाचा पाल्य असल्याचे प्रमाणपत्र देऊन नोकरीस लागलेला अन गब्बर झालेला राजरतन जायभाये आजही रुग्णालयातील कारभारात हस्तक्षेप करतो आहे.
तब्बल दोन वर्षांपूर्वी जायभाये याच्यावर कारवाई झाली,त्यानंतर त्याला बडतर्फ करण्यात आले,मात्र एवढे झाले तरी औषध खरेदी असो की इतर साहित्य खरेदी जायभाये हाच सीएस असल्यासारखा वागतो अन स्वतःच एजन्सी फायनल करून बिल देखील काढतो.या सगळ्याला ठाकर नावाचा स्टोरकीपर हा मुकसमती देतो कारण त्याचे खिसे देखील गरम केले जातात.
बडतर्फ जायभाये प्रमाणे बदली झालेला मुंडे नामक औषध निर्माता हादेखील पुरवठ्याच्या कारभारात स्वतःची हुकूमत चालवतो.तो स्वतःच मोठा सप्लायर असल्याने दुसऱ्याची येथे डाळ शिजत नाही.रक्तपेढी प्रमुख असलेल्या बांगर मॅडम यांचा भाऊच गुत्तेदार असल्याने त्या देखील नको ते साहित्य,नको असलेली औषध खरेदी दाखवून लाखो रुपये छापत आहेत.
ठाकर नावाच्या स्टोर किपर कडे पंकज कुलकर्णी हा कंत्राट संपलेला कर्मचारी कायम पडलेला असतो.एनआरएचएम मध्ये कंत्राटी असलेला हा कर्मचारी नोकरीचा काळ संपल्यानंतर देखील स्टोर विभागात कसकाय ढवळाढवळ करतो हा प्रश्न अनुत्तरित आहे.
एकूणच काय तर बीड जिल्हा रुग्णालयाला जायभाये,बांगर,मुंडे,ठाकर सारख्या घुशी लागल्या आहेत,अन या लोकांवर कारवाई झाली नाही तर रुग्णालयालाच सलाईन लावायची वेळ येऊ शकते.