January 28, 2022

बँकेच्या निवडणुकीत काका विरुद्ध पुतण्या !

बँकेच्या निवडणुकीत काका विरुद्ध पुतण्या !

बीड- केवळ जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरात आपल्या सेवेमुळे नावाजलेल्या छत्रपती शाहू को ऑपरेटिव्ह बँकेत राजकारणाने शिरकाव केला आहे.अर्जुनराव जाहेर पाटील यांच्या संकल्पनेतून उभा राहिलेल्या या बँकेत निवडणुकीच्या निमित्ताने काका विरुद्ध पुतण्या अशी लढाई पाहायला मिळणार आहे.मात्र या निवडणुकीत मतदार आपल्या पाठीशी राहतील असा विश्वास विद्यमान अध्यक्ष अजय जाहेर पाटील यांनी व्यक्त केला आहे.

निवडणूक मग ती ग्रामपंचायत असो की लोकसभा अथवा सहकार क्षेत्र,सगळीकडेच काका पुतण्या संघर्ष पाहायला मिळतो आहे.बीड पासून मुंबई पर्यंत राजकीय पटलावर काका पुतण्यातील मतभेद अनेकदा लोकांनी पहिला आहे.

बीड जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात शाखांचे जाळे निर्माण करून सचोटी अन विश्वास या जीवावर अर्जुन राव जाहेर पाटील यांनी छत्रपती शाहू बँकेचा विस्तार केला.त्यांच्या पश्चात अजय पाटील यांनी कारभार हाती घेतला.येत्या 26 डिसेंबर रोजी बँकेच्या नवीन संचालक मंडळाच्या निवडीसाठी मतदान होत आहे.

या निवडणुकीत अजय पाटील यांच्या विरोधात काका बलभीम राव जाहेर पाटील यांनी पॅनल उभा केला आहे.यावेळी कोण बाजी मारणार हे मतदार ठरवतील पण आपल्याला आपल्या कार्यावर विश्वास आहे त्यामुळे मतदार पुन्हा एकदा आम्हाला संधी देतील असा विश्वास अजय पाटील यांनी व्यक्त केला आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click