November 26, 2022

बीड आयएमए चा राज्यस्तरीय गौरव !

बीड आयएमए चा राज्यस्तरीय गौरव !

बीड – उत्कृष्ट शाखा अन अध्यक्ष म्हणून राज्यस्तरीय आयएमए परिषदेत बीडच्या शाखेचा गौरव करण्यात आला .मुंबईत पार पडलेल्या या परिषदेत डॉ अनुराग पांगरिकर यांचे विशेष कौतुक करण्यात आले.


2020 -21 या वर्षातील कामासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन बीड शाखेचा गौरव करताना आय. एम. ए. बीड चे अध्यक्ष डॉ अनुराग पांगरीकर यांना बेस्ट प्रेसिडेंट हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. महाराष्ट्र राज्यात असणाऱ्या मध्यम संख्या ब्रांचेस मध्ये (100-500सदस्य) सर्वोत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला . इंडियन मेडिकल असोसिएशन मध्ये हा पुरस्कार मिळणे हे अतिशय मानाचे आहे
इंडियन मेडिकल असोसिएशन चे भारताचे राष्ट्रीय अध्यक्ष डाॅ. जे जयालाल व सचिव डॉ जयंत लेले, महाराष्ट्र राज्याचे मावळते अध्यक्ष डॉ रामकृष्ण लोंढे व नियोजित अध्यक्ष डॉ सुहास पिंगळे यांच्या हस्ते डॉ अनुराग पांगरीकर यांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला .

इंडियन मेडिकल असोसिएशन राज्य शाखेतर्फे दिलेला हा पुरस्कार हा एकट्याचा नसून हा पुर्ण आय. एम.ए. बीड शाखेचा गौरव आहे टीम आय.एम.ए. बीड चे मोलाचे योगदान आहे ज्यामध्ये उपाध्यक्ष डॉ प्रमोद शिंदे ,सचिव डॉ सुधीर हिरवे ,सहसचिव डॉ राहुल जाजू, कोषाध्यक्ष डॉ शशिकांत दहिफळकर ,सहकोषाध्यक्ष डॉ सुनील नाईकवाडे व महिला प्रतिनिधी डॉ संजीवनी कोटेचा यांचे मोलाचे सहकार्य आहे. तसेच डॉ अनिल बारकुल डॉ पी के कुलकर्णी ,डॉ के बी पैठणकर, डॉ खरवडकर, डॉ विनोद ओस्तवाल, डॉ. ढाकणे ,डॉ पाखरे व ईतर सर्व ज्येष्ठ सदस्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click