बीड – भावकीच्या भांडणाचा त्रास इतरांना कसा द्यायचा अन त्यातून भावकीला पोलीस कारवाईला कसे सामोरे जायला लावायचे या अट्टहासापाई त्याला मंदिर उडवण्याची धमकी देण्याचा छंद जडला अन त्यातून पोलीस अन सामान्य नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागला.बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई आणि परळी येथील मंदिर उडवण्याचा प्रकार यातून घडल्याचे समोर आले आहे.अशाप्रकारे गेल्या पाच वर्षात तब्बल शंभर पेक्षा अधिक मंदिरांना धमक्या दिल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे .
नांदेड येथील सिडको परिसरातील शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक असणाऱ्या नंदकुमार डिगांबर बालुरे या शिक्षकाने उदगीर येथील त्यांची जमीन विष्णुपुरी येथील रहिवासी रतनसिंग रामसिंग दक्खने यांना विक्री केली. पण याच शेतीच्या व पैशाच्या वादातून नंतर दोघांचे खटके उडाले व वितुष्ट आले. सदर वाद न्यायालयात पोहचला. पण या वादातून रतनसिंग यांना त्रास देण्यास गुरुजींनी सुरुवात केली. ज्यात कोणाचाही मृत्यू झाला अथवा आत्महत्या झाली तर त्यात रातनसिंग यांचे नावे घेऊन पत्र व्यवहार करण्याचा सपाटा नंदकुमार बालुरे गुरुजींनी लावला. ज्यात नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन, इतवारा पोलीस, नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालय, आयजी ऑफिस नांदेड, मांडवी, किनवट पोलीस, परळी वैजनाथ मंदिर,अंबाजोगाई मंदिरास पत्र व्यवहार केल्याचे उघड झाले आहे. तर यापत्रातील अक्षर व पत्र हे नंदकुमार बालुरे यांचे नसल्याचा निर्वाळा बालुरे यांच्या शाळेने केला आहे.
एका छोट्याशा जमिनीच्या या वादातून सुरू झालेले हे धमकी सत्र 2016 पासून फक्त कोरोना काळात ही धमकी सत्र थांबले होते. मात्र आतातरी केवळ स्वतःच्या भांडणासाठी संपूर्ण यंत्रणेला धारेवर धरणाऱ्या या व्यक्तीला आवरणे गरजेचे आहे नाहीतर पुन्हा असे एखादे पत्र येईल आणि प्रशासन खडबडून जागे होईल.