March 30, 2023

राज्य रस्त्यांसाठी निधी देण्याची माजीमंत्री क्षीरसागर यांची मागणी !

राज्य रस्त्यांसाठी निधी देण्याची माजीमंत्री क्षीरसागर यांची मागणी !

बीड – बीड विधानसभा क्षेत्रातील कामे तातडिने मंजुर करुन त्यास निधी उपलब्ध करुन देण्यात यावा अशी मागणी माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली आहे

बीड विधानसभा क्षेत्रातील जनतेच्या मागणीनुसार व वाहतुक सुरुळीत होण्यासाठी
रस्त्याची कामे व पुलाची कामे खालील प्रस्तावित केल्यानुसार मंजुर करण्यात यावीत व त्यास निधी उपलब्ध करुन देण्यात यावा. तसेच शासकीय इमारती व शासकीय कर्मचाऱ्यांची निवासस्थाने मंजुर करण्यात यावीत व निधी उपलब्ध करुन द्यावा यामध्ये
1) नवगण राजुरी – रायमोह – शिरुर – चिंचपुर (SH-59) Km 15/00-60/00 Km जिल्हा -बीड एकुण 44.34 Km149.42 Cr (हेड हायब्रीड ऍन्युअटी मोड HAM) हे काम मंजूर करताना 2016 चे DSR गृहीत धरुन 2018 मध्ये निविदा बोलवल्या होत्या. सदृध्य DSR नुसार प्रपोजल रिवाइज करुन कामाचा दर्जा उंचवावा लागणार आहे. या भागातील ग्रामस्थांनी विनंती केली आहे. म्हणुन रिवाइज्ड प्रपोजल मध्ये पुढील बाबींचा समावेश करण्यात यावा.
2) शिरुर का. शहरामधुन पालखी मार्ग पैठण पंढरपुर (752E) या रस्त्यावर नं. राजुरी – रायमोह शिरुर – चिंचपुर (SH -59) हा रस्ता ओव्हरलॅप होत असुन या रस्त्याची 1200 मीटर सेव्हिंग होत आहे. या सेव्हिंग मधुन शिरुर शहराच्या दोन्ही बाजुला समप्रमाणात रुंदी वाढवणे बाबत. (वार्णी गाव ते कापरी नदी – मीटर एवजी 10 मीटर करण्यात यावा.)
3) बीड तालुक्यातील SH -55 उरणे दुर्तगती मार्ग – वडगाव – चाकण – शिक्रापुर – नवारा -खामगाव – इमामगाव – श्रीगोंदा – माहीजळगाव – जामखेड – तांबा राजुरी – बीड – लहुळ – सिरसाळा राज्य मार्ग 55 कि. मी. 260/800 ते 260/300 आणि 273/300 ते 279/300 पिंप्री तांडा – खांडे
6
पारगाव – बाभुळवाडी – मुगाव 8.50 कि. मी. या रस्त्याचे काम मंजुर असुन यासाठी रुपये 6 कोटी
मंजुर करण्यात आलेले आहेत. हा रस्त वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असुन बीड तालुका व माजलगाव तालुका या रस्त्याला जोडला जातो. हे काम मंजुर असुनही टेंडर प्रक्रिया बांधकाम विभागाकडुन वेळेत पुर्ण होत नाही. यामुळे या भागातील जनतेकडुन वारंवार आंदोलने करण्यात येत आहेत. सध्या या भागात सतत रस्ता रोको करण्यात येत आहे. व रस्ता खराब असल्यमुळे जनतेत मोठा असंतोष पसरलेला आहे. तरी या बाबत सार्वजनिक बांधकाम विभाग, बीड कार्यकारी अभियंता, बीड यांना सुचना देऊन टेंडर प्रक्रिया तातडिने पुर्ण करण्यात येऊन हे काम ताडिने सुरु करण्यात यावेत.
4) नविन प्रस्तावित काम उरणे दुर्तगती मार्ग वडगाव – चाकण – शिक्रापुर – हवरा – खामगाव इमामगाव – श्रीगोंदा – माहीजळगाव – जामखेड – तांबा राजुरी – बीड – लहुळ – सिरसाळा – राज्य
रस्ता क्र. 55 कि. मी. 257/00 ते 260/800 ते 263/300 ते 273/300 पिंप्री फाटा – पिंप्री तांडा – खांडे पारंगाव – बाभुळवाडी कि. मी. 13.500 अंदाजे किमंत 13 कोटी रुपये या 13 कि.मी कामास तातडिने मंजुरी देण्यात यावी. हा रस्ता ही पुर्ण होणे गरजेचे आहे. हा रस्ता वरील मंजुर असलेले
रस्त्यातील उर्वरित कामातील खराब झालेला रस्ता असुन हे कामही होणे गरजेचे आहे बीड ते पिंपळनेर या रस्त्याची पुर्ण लांबी 26 कि.मी. असुन यातील तेलगांव नाका – अंथरवण पिंप्री फाटा 3.70 कि.मी चे काम प्रगतीत आहे. तसेच पिंप्री तांडा ते खांडे पारगाव तसेच बाभुळवाडी ते मुगाव 8.50 कि.मी. चे काम मंजुर आहे. व अंथरवण पिंप्री फाटा – अथरवंण पिंप्री तांडा तसेच खांडे पारगांव – बाभुळवाडी हा रस्ता 13.50 कि.मी अंदाजे किमंत 13 कोटी नवीन प्रस्तावित करण्यात आलेला आहे. त्यास मंजुरी देण्यात यावी.
5) बीड तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग 361 F ते घोडका राजुरी या गावातील शेजारील काटवट
नदीवरील पुल नाबार्ड अंतर्गत प्रस्तावीत केलेला आहे. त्यास मंजुरी मिळालेली असुन याची निविदा प्रक्रिया तातडिने करण्यात यावी.
6) बीड तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग NH 52 ते कोल्हारवाडी ता. बीड जि. बीड या ठिकाणी
वाहणाऱ्या नदीवर नाबार्ड अंतर्गत नवीन पुल मंजूर करण्यात यावा.
7) बीड तालुक्यातील राज्य मार्ग 263 – बेलुरा – नारायणगड – साक्षाळपिंप्री ते प्रजिमा 18 रस्ता
प्रजिमा 30 कि. मी. 2/800 येथे पुल निर्माण करणे रुपये 1.50 कोटी मंजूर करण्यात यावेत.
8) बीड जिल्यातील डोंगरकिन्ही प्रमुख राज्य मार्ग 16 वर रायमोहा – खालापुरी – साक्षाळपिंप्री

  • सिरसमार्ग – राज्य मुख्य मार्ग 211 ते माळापुरी – कुर्ला – नाथापुर प्रजिमा 18 रस्त्यावर 41/400
    ते 41/600 मधील पुलाची बांधकाम करण्यासाठी रुपये 3 कोटी मंजूर करण्यात यावे.अशी मागणी माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली आहे याबाबत लवकरच निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन मंत्री चव्हाण यांनी दिले आहे

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click