बीड – जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी धनुभाऊ आपल्यावर आहे,आपल्याच ताब्यात जिल्हा परिषद देखील आहे,मात्र जिल्हा परिषदेच्या कारभाराकडे तुमचं लक्ष नाही बहुदा.आपल्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष हे जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष अन शिक्षण सभापती आहेत,मात्र तेच जर अधिकाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणार असतील अन धमकवणार असतील तर भाऊ कुठं तरी तुमच्या इमेजला डॅमेज करण्याचे काम होत आहे.त्याकडं जरा लक्ष द्या.
बीड जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी हे अत्यंत शिस्तीत कारभार करत आहेत,मात्र असे शिस्तीचे अधिकारी आपल्या पदाधिकाऱ्यांना बोचत आहेत.यापूर्वी कुलकर्णी यांनी दोन कोटी रुपयांच्या संगणक खरेदी बाबत आक्षेप घेण्यात आला होता.त्यावेळी कुलकर्णी यांच्यावर शिव्यांची लाखोली वाहिली गेली.
शुक्रवारी देखील शिक्षक समायोजन चा विषय रात्री उशिरापर्यंत सुरू होता.आपल्या किंवा स्थानिक आमदार,जी प सदस्य अशा अनेकांच्या शिफारसी असतात.मात्र नियमबाह्य काम करणे आपल्या पट्टणही हे जिल्हा जाणतो.मग ही गोष्ट आपल्या जी प पदाधिकारी यांना माहीत नसावी का?
आपल्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा जी प उपाध्यक्ष आणि शिक्षण सभापती असलेले बजरंग सोनवणे यांनी समायोजन विषयावरून रात्री आठ वाजण्याच्या सुमारास शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांच्या कक्षात जाऊन त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली.
आम्ही ही बातमी केल्यावर कदाचित आपल्याला आपली डॅमेज होत असलेली इमेज लक्षात घेऊन त्यांना विचारावं वाटेल,आपण विचारल्यावर नाही असे घडले नाही,मी नव्हतो,तो मी नव्हेच अशी उत्तरे दिली जाऊ शकतात.
मात्र भाऊ त्यावेळी शिक्षणाधिकारी यांच्या कक्षाबाहेर पन्नास ते शंभर शिक्षक अन कर्मचारी होते,ज्यांनी उपाध्यक्ष यांनी जी काही मुक्ताफळे उधळली ती स्वतःच्या कानाने ऐकली आहेत.
अशाच पद्धतीने जर आपले पदाधिकारी वागत राहिले तर प्रामाणिक अधिकारी जिल्ह्यात येणार नाहीत अन बीड म्हणजे बिहार ही इमेज कायम होईल तेव्हा काळजी घ्या अन अशा अर्वाच्च भाषा वापरणाऱ्या पदाधिकारी यांना मुंडेंच्या भाषेत समज द्या .