November 30, 2021

अहो आश्चर्य ! स्वछता सर्व्हेक्षणात बीड 67 नंबरवर !

अहो आश्चर्य ! स्वछता सर्व्हेक्षणात बीड 67 नंबरवर !

बीड – स्वच्छ सर्व्हेक्षण भारत योजनेत बीड नगर पालिकेचा 67 व क्रमांक आला अन तमाम बीड करांचा उर भरून आला.शहरात जिकडे पाहावं तिकडं घाणाच घाण असताना नेमकं पथकाने काय पाहिलं अन कशाच्या आधारावर ही निवड झाली हे न कळणारे आहे.ज्या शहराच्या स्वच्छतेसाठी (गुत्तेदार पोसण्यासाठी) 27 लक्ष रुपये महिन्याला खर्च होतात अन तरीही स्वछता दिसून येत नाही त्या नगर पालिकेचा कारभार कसा असेल यावर चर्चा न केलेलीच बरी अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.

बीड नगर पालिकेच्या वतीने शहर स्वच्छतेबाबत काय काळजी घेतली जाते हे सर्वांनाच माहीत आहे.शहरातील मुख्य रस्ते असोत की गल्लीबोळात प्रत्येक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे ,त्यावर कुत्रे,डुक्कर लोळत असल्याचे चित्र आता नित्याचेच झाले आहे.

एकीकडे तीस वर्षापासून नगराध्यक्ष असलेले काका अन दुसरीकडे स्वछता समिती असलेले पुतणे यांच्या वादात बीड शहराचे पार वाटोळं झालं आहे.एक रस्ता धड नाही की कुठंच कचराकुंडी नाही.अस असताना केंद्र सरकारच्या वतीने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत जे सर्व्हेक्षण करण्यात आले ते नेमके कशाच्या आधारावर केले गेले हा खरा प्रश्न आहे.

जे पथक आले होते ते डोळे झाकून शहरात फिरले का?त्यांना शहरातील तुंबलेल्या गटारी,कचऱ्याचे ढीग ,रस्त्यावरील खड्डे,त्यात साठलेले पाणी काहीच दिसले नाही का?की त्यांनी खिसे भरले अन मार्क दिले असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

बीड शहराची स्वछता ठेवण्याचे कंत्राट चाऊस नावाच्या एका व्यक्तीकडे आहे,त्याला दरमहा 27 लक्ष रुपये अदा केले जातात.कोणत्याही बीडकर नागरिकाने त्याला रस्त्यावर स्वछता कामगार दिसले का हे स्वतःलाच विचारावे, जर स्वछता होतच नाही,महिना महिना नाल्या काढल्या जातात नसतील,घंटा गाड्या बंद असतील तर मग हा चाऊस नेमका कोणाचा लाडका आहे त्यामुळे त्याच्यावर महिन्याला 27 लाख उधळले जात आहेत,याबाबत जाब देण्याची गरज आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *