September 30, 2022

कामधेनू आरोग्यधाम ची गुरुवारी दशकपुर्ती !

कामधेनू आरोग्यधाम ची गुरुवारी दशकपुर्ती !

बीड – अत्यंत प्रतिकुल परिस्थितीमधून जीवन जगणाऱ्या ज्येष्ठांना अाणि ज्यांना गाय सांभाळणे कठीन झालेले अाहे, अशा दाेन्ही जिवांना अाधार देण्यासाठी त्यांच्या संगाेपनाची जबाबदारी मागील दहा वर्षापासून कामधेनू आरोग्यधाम व गोशाळेने यशस्वीपणे पूर्ण केली अाहे. येणाऱ्या गुरुवारी (दि. २५) राेजी प.पू. श्रीगुरु चैतन्यमहाराज देगलूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काेळवाडी (ता. बीड) येथील कामधेनू आरोग्यधाम व गोशाळेचा दशपुर्ती साेहळ्याचे आयाेजन करण्यात आला आहे, अशी माहिती संचालक श्रीनिवास कुलकर्णी यांनी दिली .

त्यानुसार त्यांनी गाेभक्त रामायणाचार्य संजय महाराज पाचपाेर यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली ११ नाेव्हेंबर २०११ राेजी काेळवाडी (ता.बीड) येथे गाेशाळा सुरू केली. तसेच त्याच बराेबर अत्यंत प्रतिकुल परिस्थितीमधून जीवन जगणाऱ्या ज्येष्ठांना अाधार देण्यासाठी त्याच ठिकाणी कामधेनू अाराेग्यधाम सुरू केले. या दाेन्ही उपक्रमांना दह वर्षे पूर्ण हाेत अाहे. येथील ज्येष्ठ नागरिकांसह पशुधन देखील अत्यंत समाधानी पध्दतीने जीवनमान मागील दहा वर्षापासून जगत अाहे.  


कामधेनू आरोग्यधाम व गोशाळा, तपोवन, मोरेश्वर देवस्थान जवळ, कोळवाडी ता. जि. बीड. २५ नोव्हेंबर २०२१, गुरुवार रोजी सकाळी ११.०० वा. हाेणाऱ्या या कार्यक्रमास प्रमोदमहाराज जगताप बारामती, वेदशास्त्रसंपन्न धुंडीराजशास्त्री पाटागंणकर, माधवदास राठीमहाराज नाशिक, संजयनाना धोंडगे महाराज त्र्यंबकेश्वर,  एकनाथ महाराज पुजारी बीड, उद्योगपती  पी.यू. कुलकर्णी औरंगाबाद व श्रीसद्गुरु सेवा समिती पंढरपूरचे सर्व सन्माननिय सदस्य उपस्थित राहणार आहेत. आपण या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे अावाहन  श्रीनिवास व  मंजुषा कुलकर्णी, आणि समस्त कुलकर्णी तथा कामधेनू परीवार यांनी केले. 

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click