बीड – विधानपरिषद निवडणुका ज्या भागात आहेत त्या भागातील लोकांना प्रतिनिधित्व मिळावे ही पक्षाची भूमिका आहे त्यामुळे यावेळी मुंडेंना डावलले अस म्हणता येणार नाही अस स्पष्ट करत बीडच्या खा प्रितम मुंडे यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकार अपयशी ठरल्याची टीका केली.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण होत आहेत.या सरकारच्या अपयशाबद्दल बोलताना खा मुंडे यांनी टीकास्त्र सोडले.
राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षण नाकारले गेले ,या सर्व प्रकरणाला केंद्र सरकार जबाबदार नाही तर राज्य सरकार जबाबदार असल्याची टीका मुंडे यांनी केली.
भाजपने पुन्हा एकदा विधानपरिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांना डावलले का या प्रश्नावर बोलताना त्यांनी ही निवडणूक मराठवाड्यात होत नाहीये,ज्या भागात निवडणूक आहे त्या भागातील लोकप्रतिनिधी यांना संधी देणं आवश्यक होतं त्यामुळे डावलले गेले नाही अस त्यांनी स्पष्ट केलं.
या पत्रकार परिषदेला आ लक्ष्मण पवार,जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के,शहराध्यक्ष भगीरथ बियाणी,देविदास नागरगोजे, अशोक लोढा आदि उपस्थित होते .