बीड – बीड जिल्ह्यात गुटखा,मटका,वाळू,पत्याचे क्लब बिनधास्त सुरू आहेत.त्या त्या भागातील ठाणेदार यांचे अन एसपी चे खिसे भरून हे उद्योग सुरू आहेत.ठाणेदारांवर कोणाचेच नियंत्रण नसल्याने जिल्ह्यात अवैध धंदे बोकाळले आहेत.घरी बसून कारभार हाकणारे शुगर,त्यांच्या विरोधात मॅट मध्ये गेलेले कर्मचारी, ठाण्याच्या आवारात अवैध बांधकाम करणारे अधिकारी यांच्यावर आयजी धाक दाखवून कारवाई करणार का ? हा खरा प्रश्न आहे.
बीड जिल्ह्यात परळी पासून आष्टी पर्यंत सगळे अवैध धंदे सुरू आहेत .पोहणेर,सोनपेठ,माजलगाव, गंगामसला, गेवराई, आष्टी,शिरूर या भागात मोठ्या प्रमाणावर वाळूची तस्करी केली जाते.ही तस्करी करणारे आमदार,जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य,त्या त्या भागातील पुढारी आहेत.
गुटख्याचे जाळे देखील मोठ्या प्रमाणात पसरलेले आहे.शिवसेनेसारख्या सत्ताधारी पक्षाचा जिल्हाप्रमुख यात सहभागी आहे.जिल्ह्यात बीड,चौसाला, कुर्ला,परळी या भागात प्रशासनाने परवानगी दिलेले क्लब आहेत,मात्र तिथं दुसरेच धंदे सुरू आहेत.हे क्लब शिवसेना,भाजप,राष्ट्रवादी अशा सर्वपक्षीय कार्यकर्ते अन नेत्यांचे आहेत .
एसपी राजा रामस्वामी यांच्या कारभार अन लक्ष्मी दर्शनाची तक्रार थेट शरद पवार यांच्यापर्यंत गेली होती,दिवाळीनंतर त्यांच्या बदलीची कारवाई होईल अशी चर्चा होती,मात्र वर बसलेल्या कोणाला कस मॅनेज करायचं फक्त याचंच ट्रेनिंग घेतलेल्या शुगर साहेबांनी ते केलं असावं अन त्यामुळेच आयजी तरी त्यांच्यावर काही कारवाई करू शकतील की नाही अशी चर्चा पोलीस दलात सुरू आहे.
एकूणच काय जिल्ह्यात माफियाराज सुरू असताना एसपी राजा रामस्वामी हे मात्र हाताची घडी अन तोंडावर बोट अशा पध्दतीने कारभार हाकत आहेत.एसपी हे टोल देऊन आल्याने पूर्ण वसुली झाल्याशिवाय ते शांत बसणार नाहीत अस पोलीस दलात बोललं जातं आहे.अनेक ठाण्याचे प्रमुख हे एपीआय दर्जाचे अधिकारी आहेत अन पीआय हे कंट्रोल ला बसून आहेत.
जिल्ह्यात अवैध धंदे वाढले असताना पोलीस मात्र हप्तेखोरी करण्यात मश्गुल आहेत.सुजित बडे सारखे काही लोक तर अवैध बांधकाम ठाण्याच्या हद्दीत करून देखील एसपी नि काहीच कारवाई केलेली नाही.तुम्हाला काय कमवायचे ते कमवा पण मला महिन्याला एवढे आणून द्या,अस सूत्र जिल्ह्यात सुरू आहे.
औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.त्यांनी जिल्ह्यात सुरू असलेले मटका,गुटखा अन वाळू च्या धंद्यातून किती कलेक्शन होते हे देखील एकदा तपासावे.एसपी चा जर असाच कारभार असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत आयजीनी दाखवावी,नाहीतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याशिवाय राहणार नाही.