May 27, 2022

नेत्रधाम परिसरातील कामाची नागराध्यक्षांनी केली पाहणी !

नेत्रधाम परिसरातील कामाची नागराध्यक्षांनी केली पाहणी !

बीड- शहरातील नेत्रधाम परिसरातील स्वा सावरकर महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम करावे ही मागणी केली जात होती दोन दिवसांपूर्वीच नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर या भागात जिमच्या शुभारंभ साठी आले होते,तेथे रस्त्याच्या कामाची मागणी केली होती कुठलाही मोठेपणा न करता आज सोमवारी थेट कामालाच सुरुवात करण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे

बीड शहरातील नेत्रधाम परिसरातील स्वा सावरकर महाविद्यालयाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम होणे महत्त्वाचे होते अनेक दिवसांपासून या भागातील नागरिकांनी यासाठी पाठपुरावा केला होता तसेच सावरकर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी आणि संस्थाचालकांनी ही मागणी केली होती शनिवारी महाविद्यालयात नगराध्यक्षांच्या हस्ते ओपन जिमचे उद्घाटन करण्यात आले

या उद्घाटन प्रसंगी रस्त्याचे काम देखील करण्यात येईल असे आश्वासन नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी दिले होते आज सोमवारी अचानक जेसीबी, रोड रोलर खडीचा ट्रक आणि मजूर या भागात येऊन धडकल्या आणि थेट कामाला सुरुवात करण्यात आली अचानक पणे सुरु झालेल्या या कामामुळे नागरिकही अचंबित झाले होते तेव्हा एका नागरिकाने थेट अध्यक्ष साहेबांना फोन केला तेव्हा डॉ क्षीरसागर यांनी येऊन कामाची पाहणी केली

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click