November 30, 2021

कुंडलिक खांडे यांच्या पदाला स्थगिती !!

कुंडलिक खांडे यांच्या पदाला स्थगिती !!

बीड- गुटखा तस्करी प्रकरणात गुन्हा दाखल झालेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या पदाला स्थगिती देण्यात आली आहे.नवीन जिल्हाप्रमुखाची नियुक्ती लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली आहे .

पाच दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात तीन ते चार ठिकाणी गुटख्याच्या गोदामावर छापा घालत प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक कुमावत यांच्या पथकाने लाखो रुपयांचा गुटखा पकडला होता.यावेळी हा सगळा धंदा शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचा असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर खांडे अन आबा मुळे यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल झाला.बीड जिल्ह्याच्या इतिहासात एखाद्या जिल्हाप्रमुख पदावर असलेल्या व्यक्तीवर गुटखा तस्करी प्रकरणात गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच घटना आहे.या घटनेनंतर सुद्धा खांडे हे उजळ माथ्याने जिल्ह्यात पक्षाच्या कार्यक्रमात फिरत असल्याचे दिसून आले.

या सगळ्या प्रकाराची दखल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे.शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना मध्ये बीड जिल्हाप्रमुख पदाला स्थगिती अशा मथळ्याखाली वृत्त देण्यात आले आहे.शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या पदाला स्थगिती देण्यात आली असून नवीन जिल्हाप्रमुखाचे नाव पक्षप्रमुख लवकरच जाहीर करतील असे म्हटले आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *