बीड – गेल्या वर्षभरात गुटख्याच्या अनेक प्रकरणात गुन्हे दाखल झाल्यानंतर देखील पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झालेल्या आबा मुळे ने रेकॉर्ड वर फरार रहात बंगल्याचे बांधकाम पूर्ण करून घेतले,मुळे आबाच्या बंगल्याला अन कुंडलिक खांडे च्या पदाला गुटख्याच्या विटा असल्याने एक दिवस ते ढासळणार हे नक्की आहे.
बीड जिल्ह्यात कर्नाटक,मध्यप्रदेश, बेंगलोर या भागातून मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी होते.बीड जिल्ह्यात परळी,माजलगाव, बीड या ठिकाणाहून मुळे आबा,सनाउल्ला,जाधव,परळीचा फेरोज,लाहोटी यांनी जिल्ह्याची गुटख्याबाबत मुकादमकी केली.त्यांना खांडे सारख्या जिल्हाप्रमुख पदावरील लोकांनी पार्टनरशिप करत पाठिंबा दिला.
गेल्या तीन चार वर्षात खांडे याने या धंद्यातून कोट्यवधी रुपये कमावले.दुसरीकडे पाहुणा असलेल्या मुळे आबा ने देखील जिल्ह्यातच नव्हे तर जिल्ह्याबाहेर देखील गुटख्याचे नेटवर्क लावले.मागील वर्षभरापूर्वी मुळे आबाचा गुटख्याचा टेम्पो पेठ बीड पोलिसांनी सोडून दिला,नंतर पकडला मात्र अद्याप मुळे फरारच आहे.
वर्षभरात मुळे वर तीन ते चार गुन्हे दाखल झाले,मात्र एकाही प्रकरणात त्याला अटक झाली नाही.या वर्षभरात या मुळे ने जालना रोडवर बंकटस्वामी महाविद्यालयामागे बंगला बांधला.रोज या ठिकाणी तो हजर असताना पोलीस दफ्तरी मात्र फरारच होता.
चार दिवसांपूर्वी मुळे आणि खांडे या दोघांवर गुन्हा दाखल झाला,दोघेही फरार झाले,खांडे हा त्यानंतर शिवसेनेच्या सार्वजनिक कार्यक्रमात हजर होता.पोलीस मात्र हातावर हात बांधून होते.
गुटख्याच्या पैशातून मुळे चा बंगला तर झालाच पण खांडे चे पद देखील टिकले हे विशेष. बीडचे पोलीस अधीक्षक आर रामस्वामी हे आता या दोघांना बेड्या घालणार का पायघड्या हे बघणे औत्सुक्याचे आहे.