December 10, 2022

तुरीवर किडीचा प्रादुर्भाव ! तातडीने उपाययोजना करा !!

तुरीवर किडीचा प्रादुर्भाव ! तातडीने उपाययोजना करा !!

बीड – अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक गेले मात्र तुरीचे जे पीक राहिले त्यावर देखील अळ्या आणि किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे,त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य पध्दतीने फावर्णीआणी तणनाशक यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

वातावरणातील बदलामुळे कीड आणि शेंगाना हानी पोहचवणाऱ्या अळ्या तसेच त्यापासून होणाऱ्या रोगांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. जेणेकरून खरीप हंगामातील इतर पिकांच्या उत्पादनाची भरपाई हि या पिकाच्या उत्पादनातून पूर्ण करता येईल. मात्र, यासाठी तूर पिकावर आलेल्या कीडीचे व्यवस्थापन करणे हाच एकमात्र पर्याय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ह्या पिकावर आलेल्या किडीवर वेळीच नियंत्रण मिळवायला पाहिजे. यासाठी कृषी विद्यापीठाणे सांगितलेल्या सूचनेची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. ह्या संकटाला सामोरे जाण्यासाठी कृषी विभागाने एक यंत्रणा तयार केली आहे, जर शेतकऱ्यांनी त्यानुसार उपाययोजना केल्या तर नक्कीच तुरीच्या उत्पादनात हि लक्षणीय वाढ होऊ शकते आणि जे उत्पादन कमी मिळणार होते ते अधिक मिळेल आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा हा मिळेल.

तुरीची ज्या पानांवर अळींचे संक्रमण आहेत अशी पाने गोळा करून अळ्यांसह नष्ट करावे.तूर पिकातून वेळोवेळी निंदनी करून तण काढून टाकावे म्हणजे हवा हि खेळती राहील शिवाय त्यामुळे दुसरे रोग पिकावर येणार नाहीत.

तुरीचे पिक हे फुलोऱ्याच्या अवस्थेत असताना प्रति एकर 2 कामगंद जाळी एक फूट उंचीवर लावावी.शेतकरी मित्रांनो शेतात एकरी 20 ते 30 ठिकाणी एक ते दोन फूट उंचीवर बर्ड स्टॉपची स्थापना करावी. यामुळे पक्ष्यांना अळ्यांची शिकार करता येईल.

फुलोरा सुरू होताच, 25 ml 5% निंबोळी अर्क किंवा Azadirachtin 300 ppm प्रति 5 लिटर पाण्यात द्रावण तयार करून फवारणी करण्याचा सल्ला कृषी वैज्ञानिक देतात.दुसरी फवारणी हि जेव्हा शेंगा खाणाऱ्या अळ्या ह्या पहिल्या अवस्थेत असतील तेव्हा करावी. शेतकरी मित्रांनो दुसरी फवारणी हि संध्याकाळी करावी असा सल्ला दिला आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click