November 30, 2021

शिवसेना जिल्हाप्रमुख निघाला गुटखा तस्कर ! मुळे आबा सह खांडे वर गुन्हा दाखल !!

शिवसेना जिल्हाप्रमुख निघाला गुटखा तस्कर ! मुळे आबा सह खांडे वर गुन्हा दाखल !!

बीड – गुटखा तस्करी अन विक्री प्रकरणात बीडचे शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचे नाव आले असून खांडे यांच्यासह महारुद्र मुळे (आबा) यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.गेल्या तीन महिन्यात मुळे वर दाखल झालेला हा तिसरा ते चौथा गुन्हा आहे,मात्र आरोपी मुळे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही हे विशेष.शिवसेना जिल्हाप्रमुखावर गुटखा तस्करी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याने जिल्ह्यात माफियाराज मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.अन या सगळ्या प्रकरणाला राजकीय वरदहस्त असल्याचे स्पष्ट झाले आहे .दरम्यान या प्रकरणात आरोपी खांडे यांच्या अटकेसाठी पोलीस त्यांच्या घरी जाऊन आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे .

केजचे सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांनी मंगळवारी केज तालुक्यातील नांदूरघाट येथे दोन ठिकाणी छापे मारले. त्यानंतर बीडमधील दोन गोदामांचीही त्यांनी झडती घेतली. मंगळवारी सायंकाळी चंद्रकांत रामेश्वर कानडे याच्या दुकानावर छापा टाकला. याशिवाय, रामहरी वैजीनाथ जाधव याच्या दुकानावरही छापा टाकला. दोघांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली.

चंद्रकांत कानडे याने अन्य तिघांकडून हा गुटखा आल्याचे सांगितले, तर जाधवने दोन साथीदारांची नावे सांगितली. त्यानुसार, केज ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे नोंद करण्यात आले. दरम्यान, चंद्रकांत कानडेकडे आढळलेल्या गुटख्याचे धागेदोरे गुटखा माफिया महारुद्र मुळे, शेख वसीम शेख सिराज व शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यापर्यंत असल्याचे चौकशीत समोर आले. त्यामुळे शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे .

सत्ताधारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जर गुटखा,मटका,पत्याचे क्लब अन वाळू तस्करी मध्ये सहभागी होत असतील तर मुख्यमंत्री अन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे लक्ष घालणार का,अन पक्षाची अशा पध्दतीने बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करणार का असा सवाल उपस्थित होत आहे.

चंद्रकांत कानडे याने चौकशीत दिलेल्या माहितीवरून सहायक अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने बीडमधील इमामपूर रोडवरील गोदामात व जालना रोडवरील एका गोदामात रात्री आठ ते नऊ दरम्यान धाडी टाकल्या. यावेळी १२ लाख किमतीचा टेम्पो (एम. एच. २६ बी. ई.- १९२६) व २० लाख रुपयांचा गुटखा, जाधव प्रकरणात एक लाख ९७ हजार रुपयांचा गुटखा असा सुमारे ३४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुटख्याच्या या काळ्या धंद्यात आबा मुळे हा पडद्यासमोरील सूत्रधार असला तरी मूळ माफिया हा कुंडलिक खांडे असल्याचे या कारवाईने स्पष्ट झाले आहे.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटखा तस्करी अन विक्री होत असला तरी पोलीस अधीक्षक यांचे मात्र या धंद्याना पाठबळ असल्याचे यापूर्वी सिद्ध झाले आहे.आता तरी खांडे अन मुळे याना अटक होणार का हाच खरा प्रश्न आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *