April 1, 2023

जिल्ह्याच्या सुपुत्राने मान उंचावली ! सोमय मुंडे यांचा देशपातळीवर डंका !!

जिल्ह्याच्या सुपुत्राने मान उंचावली ! सोमय मुंडे यांचा देशपातळीवर डंका !!

बीड- गडचिरोली येथे तब्बल 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालणाऱ्या पोलीस पथकाचे प्रमुख हे बीड जिल्ह्यातील सुपुत्र असून त्यांच्या या कामगिरीमुळे बीड जिल्ह्यासह मराठवाड्याची मान उंचावली आहे.सोमय मुंडे यांचे आजोळ बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईचे असून मुळगाव नांदेड जिल्ह्यातील देगलूर हे आहे.मराठवाड्याच्या या भूमीपुत्राच्या कामगिरीची दखल थेट पंतप्रधान कार्यालयाने घेतली आहे हे विशेष.

आयपीएस अधिकारी सोमय मुंडे हे देगलूर येथील डॉक्टर दाम्पत्य डॉ. मुक्ता विनायक मुंडे आणि डॉ. विनायक चंद्रसेन मुंडे यांचे चिरंजीव आहेत. वडील विनायक मुंडे मूळचे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील सनगाव येथील मूळ रहिवाशी असून, गेल्या 40 वर्षांपासून देगलूर येथे स्थायिक आहेत. डॉ. विनायक मुंडे हे जनरल सर्जन तर आई डॉ. मुक्ता ह्या स्त्रीरोग तज्ज्ञ आहे. त्यांना दोन मुले असून, सोमय हे थोरले असून मुलगी सुमंता ह्या कॉम्प्युटर सायन्स करतायेत.

सोमय विनायक मुंडे हे नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील मूळ रहिवासी आहेत. 31 वर्षे वयाच्या सोमय विनायक मुंडे यांचं लहानपणापासूनच आयपीएस अधिकारी व्हायचं स्वप्न होतं. सोमय मुंडे यांचे शिक्षण एमटेक, आयआयटीमध्ये झालेय. सोमय मुंडे यांचे शालेय शिक्षण हे देगलूर येथील साधना हायस्कूलमध्ये झाले. तर माध्यमिक शिक्षण सातारा सैनिकी शाळा आणि राष्ट्रीय मिलिटरी कॉलेज डेहराडून या ठिकाणी झालंय. सोमय यांनी आयआयटी आणि एमटेक ही पदवी संपादन केलेली असून, सोमय हे केंद्रीय लोकसेवा आयोगाची 2016 ची परीक्षा पास होऊन IPS अधिकारी झालेत.

सोमय विनायक मुंडे यांची पहिली पोस्टिंग ही औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर या ठिकाणी झाली. त्यानंतर ASP अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी येथे आणि आता गडचिरोली जिल्ह्यातील आहेरी येथे ऍडिसनल एसपी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी या अगोदर अनेक धाडसी कार्यवाही केल्यात. ज्यात मार्च 2021 छत्तीसगड परिसरातील अबुजमाळ येथे नक्षली परिसरात जाऊन त्यांचा अड्डा उद्ध्वस्त करत एन्काऊंटर कार्यवाही करून शस्त्र हस्तगत केले होते. तर जून 2021 रोजी गडचिरोली येथील अटापल्ली येथे धाडसी कार्यवाही करत 13 नक्षलींना कंठस्नास घातले होते.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click