December 10, 2022

भाव भक्तीचा संगम म्हणजे पाटांगणावरील उत्सव – क्षीरसागर !

भाव भक्तीचा संगम म्हणजे पाटांगणावरील उत्सव – क्षीरसागर !

बीड/प्रतिनिधी
धार्मिक क्षेत्रात एकमेवाद्वितीय अग्रेसर असलेल्या बीड शहरात अनेक मोठी मंदिरे आहेत या बरोबरच थोरले पटांगण धार्मिक उत्सवासाठी प्रसिद्ध आहे भाव आणि भक्तीचा संगम या ठिकाणी आवर्जून दिसतो सूर आणि ताल याचा सुरेख संगम ऐकून मंत्रमुग्ध होते या ठिकाणचा प्रसाद घेतल्यानंतर प्रेरणा मिळते असे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केले आहे

बीड येथील थोरल्या पटांगणावर 421 वा वार्षिक उत्सव सध्या सुरू आहे ह भ प धुंडीराज महाराज पाटांगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या उत्सवात आज दुसऱ्या दिवशी बीडच्या स्थानिक कलाकारांची स्वरसंध्या आयोजित करण्यात आली होती ज्येष्ठ गायक भरत लोळगे,सतीश सुलाखे महेश वाघमारे,न्या शरद देशपांडे,शिक्षणाधिकारी विक्रम सारूक,अरविंद मुळे,शुभांगी मोरे,पूजा नाईकवाडे,मंगेश लोळगे,स्वयंप्रकाश खडके,संवादिनी साथ संगत सुदर्शन धुतेकर,तर तबला साथ नरहरी दळे,प्रशांत सुलाखे,के सी चव्हाण,यांनी केली,तर शामसुंदर मुळे,प्रमोद वझे,सचिन मार्गे,अवधूत घुगे,आदींनी संगीत सेवा सादर केली

यावेळी संस्थानच्या वतीने माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे स्वागत करण्यात आले यावेळी प्रा जगदीश काळे,सभापती दिनकर कदम,विलास बडगे,अरुण डाके,नगरसेवक राजेंद्र काळे,सखाराम मस्के,यांचीही उपस्थिती होती प्रास्ताविकात बोलताना 421 वर्षाच्या अखंड परंपरेची माहिती देत ह.भ.प. धुंडिराज शास्त्री पाटांगणकर महाराजांनी सांगितले की जेव्हा जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा अण्णा पाठीशी असतात स्व काकूपासून ते अण्णां पर्यंत या उत्सवाला त्यांची उपस्थिती आवर्जून आहे अखंडपणे उत्सव आहे तसा अखंडपणे त्यांचा सहवास लाभतो आहे,बीडच्या सर्वच क्षेत्रासाठी अण्णांचे सहकार्य असते,त्याची आवड देखील आहे,असे सांगून त्यांनी पारंपरिक उत्सवाची माहिती दिली


यावेळी बोलताना माजीमंत्री क्षीरसागर म्हणाले की, आज योगायोगाने कार्तिकी एकादशी आणि त्याच दिवशी या वार्षिक उत्सवाला उपस्थित राहण्याचा योग आला, दर वर्षी उपस्थिती असतेच ,प्रथेप्रमाणे आशीर्वाद घेण्यास येत असतो पुढच्या वाटचालीसाठी या आशीर्वादाची कवचकुंडले प्रेरणा देत राहतात, आज योगायोगाने बीडच्या स्थानिक कलाकारांची स्वर संध्या ऐकण्याचा लाभ मिळाला स्वर आणि तालाचा सुंदर मिलाप ऐकला की दिवसभराचा ताण जातो,संगीत मनाला आनंद देणारे आहे, अनेक गीतांनी बहरलेले संगीत मनाला शांती देते असाच योग इन्फंट इंडिया या संस्थेत दिवाळीच्या दिवशी आला होता, बीडचे कलाकार लोळगे,सुलाखे जेव्हा गायला सुरुवात करतात तेव्हा मन तल्लीन होऊन जाते सूर आणि ताल याचा सुरेख संगम आज ऐकायला मिळाला या ठिकाणी भक्तिभावाने येऊन प्रसाद घेतला जातो, भाव आणि भक्तीचा संगम म्हणजे हा उत्सव आहे, गीतातून प्रश्न आणि त्यातूनच उत्तर अशी अनेक गीते ऐकून मन प्रफुल्लित होते, दिनचर्येत अनेक प्रसंग असतात विखुरलेले पांगलेले मन संगीतामुळे एकरूप राहते असे सांगून त्यांनी कलाकारांनी सादर केलेल्या गीताला प्रतिसाद देत कौतुक केले,यावेळी ऍड अरुण गोस्वामी,भालचंद्र गोस्वामी,विनायक पाटांगणकर,सिद्धार्थ पाटांगणकर,मंत्रमुर्ती पाटांगणकर सौ नीलिमा,राधिका,कीर्ती पाटांगणकर यांनी सर्व कलाकाराचे स्वागत केले,यावेळी जेष्ठ पत्रकार प्रमोद कुलकर्णी, सुरेश साळुंके,प्रमोद वझे गिरीश देशपांडे आदि उपस्थित होते

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click