परळी – राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर भाजपच्या माजीमंत्री पंकजा मुंडे यांनी सडकून टीका केली आहे.निवडणूक सुरू होत आहे,जिल्ह्यात माफियाराज सुरू आहे,मला त्यांच्यासारखं खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करता येणार नाही मात्र कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले .
परळी येथे आयोजित दिवाळी स्नेहमीलन कार्यक्रमात मुंडे बोलत होत्या.यावेळी त्यांनी आगामी नगर परिषद निवडणूक कार्यकर्त्यांनी जोमाने लढवावी असे आवाहन केले.
आगामी काळात परळीत नगरपरिषद निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करणे गरजेची आहे. आगामी काळातील निवडणूक लक्षात घेता आरोप-प्रत्यारोपांची लड अजून वाढतच जाईल, यात शंका नाही. मात्र, आता गप्प बसणार नाही. या ठिकाणी सध्या माफियाराज सुरू आहे. त्याच्या विरोधात लढा देणार आहे.
अजून निवडणुकीला खूप दिवस शिल्लक आहेत. मात्र, मला गप्प बसता येणार नाही. धनंजय मुंडेंवर टीका करण्यासाठी मला त्या पातळीला जावे लागेल. मात्र, ते मला कधीच जमणार नाही. तसे मी करणारही नाही. कार्यकर्त्यांनो निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागा. लढाई आता सुरू झाली आहे, असे मुंडे यांनी म्हंटले.