पंढरपूर – राज्याची आर्थिक स्थिती अद्याप सुधारलेली नाही,त्यामुळे पेट्रोलियम पदार्थावरील व्हॅट कमी करणे शक्य नसल्याचे सांगत अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पेट्रोल अन डिझेल चे भाव कमी करणे अशक्य असल्याचे स्पष्ट केले.
कार्तिक यात्रेनिमित्त पंढरपुरातील विठ्ठलाच्या शासकीय महापूजेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पंढरपूर येथे आले होते.यावेळी बोलताना ते म्हणाले की,अजून आर्थिक घडी नीट बसलेली नसून पगार आणि दैनंदिन खर्च तसाच असल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या वरील राज्यांचा कर कमी होण्याची शक्यता नाही. तरीही येत्या अधिवेशनापूर्वी कर कमी करायचे असतील तर किती आर्थिक नुकसान सोसावे लागेल ते पाहून निर्णय घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
महा पूजेनंतर मंदिर समितीने घेतलेल्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ औसेकर महाराज, कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अरविंद माळी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, विशेष प्रशासकीय अधिकारी सचिन ढोले, हभप ज्ञानेश्वर महाराज जळगावकर देशमुख, साधना भोसले, शकुंतला नडगिरे, तलाठी राजेन्द्र वाघमारे, मंडळ अधिकारी विजय शिवशरण उपस्थित होते.
पुढे पवार म्हणाले, विठ्ठलाच्या शासकीय महापूजेनंतर राज्याला सुख शांती नांदावी. वारीची परंपरा कायम सुरू राहावी, असे साकडे याकडे घातले आहे. कारण सध्या चायना , रशिया व युरोप मध्ये कोरोनाने तोंडवर काढले आहे. आरोग्य विभागाच्या सुचानेनेच नागरिकांनी कोरोना बाबत उपचार घ्यावेत. कोरोना संपला नाही. प्रत्येकाने दुसरा डोस देखील घ्यावा असे आवाहन राज्यातील जनतेला पवार यांनी केले.