बीड- राज्यातील काही भागात हिंसक आंदोलन झाल्याने कायदा अन सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.त्यामुळे बीड जिल्ह्यातील नागरिकांनी संयम बाळगावा, कोणतेही जाती,धर्म बाबत तिढा निर्माण करणारे मेसेज करू नयेत अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असा ईशारा पोलीस अधीक्षक आर रामस्वामी यांनी दिला आहे .
गेल्या दोन दिवसापासून महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी आंदोलकांनी हिंसक वळण घेतले. त्यातून अप्रिय घटना घडल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे त्याठिकाणच्या सर्व धर्म व जातीच्या सर्वसामान्य नागरिकांना, महिलांना, बालकांना, तसेच रुग्णांना त्रासाला सामोरे जावे लागले आहे. त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमी बाबतच्या सर्व सत्यता पडताळून पाहण्यात आलेल्या आहेत.
म्हणून आपण सर्वांनी शांतता ठेवावी. अफवांवर विश्वास ठेवू नये आणि त्यातून कुठल्याही प्रकारे कायदा-सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण करू नये.कोणत्याही प्रकारे कायदा हातात घेऊ नये.
सोशल मीडिया, व्हाट्सअप इतर माध्यमातून कोणीही कोणत्याही प्रकारची अफवा पसरू नये. कोणत्याही प्रकारचा अफवा पसरविणारा, सामाजिक तेढ निर्माण करणारा व्हिडिओ/ मेसेज/ फोटो व्हायरल करू नये.असे करताना कोणीही दिसून आले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. बीड पोलिसांची जिल्ह्यातील सोशल मीडिया आणि इतर समाजकंटकांवर करडी नजर आहे.
तरी आपण सर्वांनी कोणत्याही प्रकारे जातीय/ सामाजिक तेढ निर्माण होण्याची संधी कोणालाही देऊ नये, बंधुभावाची, सलोख्याची,मानवतेची वागणूक ठेवावी.