बीड – बीड आगारात मागील नऊ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. आणि याच कर्मचाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था व्हावी, म्हणून बीड व्यापारी महासंघाने पुढाकार घेतला आहे. कॅट या आंतरराष्ट्रीय व्यापारी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष व वैष्णो देवी मंदिर संस्थान बीड चे संस्थापक अध्यक्ष संतोष सोहनी व कॅट व्यापारी संघटनेचे शहराध्यक्ष विनोद पिंगळे व व्यापारी महासंघाच्या सदस्यांनी शनिवार दी.13 रोजी बीड आगारात एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला हजर राहून पाठिंबा दिला. यावेळी व्यापारी महासंघाने नुसता पाठिंबाच दिला नाही तर त्याचबरोबर बीड आगारातील एसटी कर्मचाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. या सहकार्याबद्दल एसटी महामंडळाच्या बीड आगारातील कर्मचाऱ्यांनी संतोष सोहनी, विनोद पिंगळे व व्यापारी महासंघाच्या सर्वपदाधीकार्यांचे आभार मानले
मागील नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलना दरम्यान बीड आगारातील एसटी कर्मचाऱ्यांच्या जेवणाचे मोठे हाल होत आहेत. आणि हीच बाब लक्षात घेऊन आंतरास्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या कॅट व्यापारी महासंघाचे बीड जिल्हाध्यक्ष संतोष सोहनी, शहराध्यक्ष विनोद पिंगळे व व्यापार्यांनी शनीवार दी.13 रोजी पुढाकार घेत एसटी कर्मचार्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत पुढाकार घेतलाय, एसटी कर्मचाऱ्यांना आगारातच जेवणाची व्यवस्था करण्यात आलीय. केवळ एसटी कर्मचारी नाही तर त्यांचे संपूर्ण कुटुंब याठिकाणी गेल्या काही दिवसापासुन काम बंद आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे या ठिकाणी जेवणाची भ्रांत निर्माण झाली होती. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संतोष सोहनी यांनी यासाठी पुढाकार घेत जेवणाची व्यवस्था केलीय.
शनिवारी संतोष सोहनी आणी विनोद पिंगळे यांनी बीड आगारात येऊन स्व्तःता कर्मचार्यांना जेवन वाढले.एसटी कर्मचार्यांच्या आंदोलनाला व्यापारी महासंघाचा पाठिंबा असून आंदोलना दरम्यान कोणतीही मदत लागल्यास हक्काने सांगा तत्काळ मदतीला धाऊन येईल असे संतोष सोहनी यांनी सांगितले. जेवनाची केलेली उत्तम व्यवस्था पाहुन एसटी कर्मचारी भाराऊन गेले होते.