बीड – शिक्षण विभागाचा तुघलकी कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.10 नोव्हेंबर पर्यंत असलेल्या दिवाळीच्या सुटयात 16 पर्यंत वध केली होती .आता पुन्हा एकदा या सुट्या 20 पर्यंत वाढवल्या असून शाळा 22 नोव्हेंबर रोजी सुरु होतील.परीक्षा असो की परिपत्रक प्रत्येकवेळी घोळ घालण्याची परंपरा शिक्षण विभागाने कायम ठेवली आहे .
राज्यातील पाचवी ते बारावीच्या शाळा ऑक्टोबर मध्ये सुरू करण्यात आल्या.या शाळांना दिवाळीच्या सुट्या अगोदर 20 नोव्हेंबर पर्यंत देण्याचा निर्णय झाला मात्र पुन्हा सुट्या दहा दिवस कमी करून 10 नोव्हेंबर पासून शाळा सुरू करण्याचे आदेश आले.
त्यानंतर9 नोव्हेंबर रोजी शिक्षण विभागाने परिपत्रक काढले अन 16 नोव्हेंबर पर्यंत सुट्या वाढवल्या असल्याचे म्हटले.त्यामुळे शाळेवर रुजू होण्यासाठी आलेल्या शिक्षकांत काहीसा आनंद होता.आता पुन्हा एकदा तिसरे परिपत्रक काढून शिक्षण विभागाने 20 नोव्हेंबर पर्यंत शाळाना सुट्या असतील असे म्हटले आहे .
21 रोजी रविवार असल्याने शाळा 22 पासून सुरू होतील.शिक्षण विभाग गेल्या अनेक वर्षांपासून अशाच प्रकारे ढिसाळ नियोजन करून टीकेचा धनी होत आहे.