बीड- हजारो शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणण्यासाठी महत्वाचा असलेल्या डिसलेवाडी साठवण तलावास मंजुरी मिळवण्यात आ संदिप क्षीरसागर यांना यश आले आहे.या प्रकल्पामुळे तब्बल सातशे हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.पालकमंत्री धनंजय मुंडे आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास येणार असल्याचे आ क्षीरसागर यांनी म्हटले आहे.
याबाबत आ. संदीप क्षीरसागर यांचा पालकमंत्री तथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने पाठपुरावा सुरू होता.डिसलेवाडी ता.शिरूर कासार साठवण तलावास मंजुरी देवून निधी देण्यता यावा अशी मागणी आ.संदिप क्षीरसागर यांनी बीड चे पालकमंत्री तथा सामाजीक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन वर्षापासून सुरू असून यातील तांत्रिक अडचणी दूर करत त्यांचा पाठपुरावा सुरू आहे. या प्रकल्पाला त्यांनी मेरी नाशिककडून पाणी उपलब्धता प्रमाणपत्रही मिळवून घेतले. हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर सदर तलावाचे काम तातडीने हाती घेण्यात यावे या मागणीसाठी आ.संदिप क्षीरसागर यांनी जलसंधारण मंत्री शंकरराव गढाख यांची भेट घेवून मागणी केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस माजी आ.अमरसिंह पंडित साहेब देखिल उपस्थित होतेे. सदरील साठवण तलाव पुर्ण झाल्यास शिरूर कासार तालुक्यातील बीड मतदार संघातील 700 हेक्टर जमीन सिंचनाखाली येवून शेतकर्यांच्या दृष्टीने मोठे विकास काम होवू शकेल. या संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या मागणीवरून जलसंधारण मंत्री शंकरराव गढाख यांनी तातडीने सर्व्हेक्षण करून अंदाजपत्रक सादर करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत. त्यामुळे आता गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागणार आहे. सदर काम पुर्णपणे जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत माझा सातत्याने पाठपुरावा सुरू राहिल असे आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी म्हटले आहे.