January 30, 2023

विकास काय असतो ? चकलांबा वासीयांचा सवाल !

विकास काय असतो ? चकलांबा वासीयांचा सवाल !

चकलंबा- निर्लज्जला लाज नाही आणि कालचा कोडगा आज नाही ही मराठी म्हण प्रचलित आहे,वर्षानुवर्षे होत आले,अनेक योजना तयार झाल्या,योजनेचा पैसा देखील आला मात्र विकास केवळ कागदोपत्रीच होऊन गेला अशी गत या गावाची झाली आहे,40 वर्षात एकही रस्ता धड झाला नाही की गावात कुठे नाली झाली नाही,13 हजार मतदानाचे गाव पुढाऱ्यांनी केवळ मतदानासाठीच वापरून घेतले ही शोकांतिका आहे,गटबाजीमुळे गावचा खुंटला असून आतापर्यंत झालेल्या सर्वच विकास कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी यासाठी विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात येणार असल्याचे काही गावकऱ्यांनी सांगितले आहे

चकलंबा हे गाव गेवराई तालुक्यातील मोठे गाव आहे इथे अनेकानी सरपंच पद भूषवले,मोठेपणा घेतला,अनेकांनी जिल्हा परिषद निवणुका लढल्या आणि पुढारपण करून घेतले ,याच गावच्या जीवावर अनेकांनी आमदारकी मिळवली,खासदारांनी देखील या गावात येऊन कामाचे आश्वासने दिले पण लबाडाचे अवतन काहीही कामाचे नाही हे पुन्हा सिद्ध झाले,आजही गावात जाण्यासाठी साधा रस्ता नाही,मुख्य रस्ते अतिक्रमणामुळे व्यापून गेले एक वाहन आले तर दुसरे अडकून पडते, गावात श्री रोकडेश्वर हे ग्रामदैवत आहे बाहेरून आलेल्या वाहनांना गावाच्या बाहेर थांबावे लागते,जायचेच झाले तर गोखाडीतून वाट काढत जावे लागते,गाव अजूनही हंगनदारीमुक्त नाही,योजनेचा पैसा जातो कुठे हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे,

मध्यंतरी पावसाळ्यात सर्वच रस्ते बंद होते तेव्हा किमान मुरूम टाकावा म्हणून साडे सहा लाख रुपये मंजूर झाले हे लाखाचे बजेट मुरूमात गेले की मातीत गेले हेही कुणाला माहीत नाही,वित्त आयोगाचा आलेला पैसा जातो कुठे याचाही ताळमेळ नाही,ही स्थिती आजची नाही तर अनेक वर्षांपासून आहे मग गावचा विकास होणार कधी?हा प्रश्न अनुत्तरित राहणार आहे,पुढाऱ्यांनी फक्त गावचा वापर मतदानासाठीच केला ही लाजिरवाणी घटना या गावच्या बाबतीत झाली आहे,हा सारा विचार करून काही सुजाण आणि सतर्क ग्रामस्थांनी आता विभाषीय आयुक्त यांच्याकडे निवेदन देऊन आतापर्यंत आलेला निधी,झालेली कामे यांचे ऑडिट करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले आहे

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click