बीड – पावसाळ्यात बिंदुसरा धरण आणि नदीला येणाऱ्या महापुरात जे लाखो लिटर पाणी वाया जाते ते बीडकरांच्या वापरात यावे यासाठी गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा करणाऱ्या आ संदिप क्षीरसागर यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बिंदुसरा नदीवर निम्न पातळी बंधारा मंजूर केला आहे.त्यामुळे आता बीड वासीयांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील सुटणार आहे .
बीड शहरातील बिंदुसरा नदीवर बंधारा कम पूल करण्यात यावा अशी मागणी पेठ बीडसह शहरातील नागरिक यांच्या कडून करण्यात येत होती,मागील अनेक दिवसांपासून आ. संदीप भैय्या क्षीरसागर यांनी सदर प्रश्न हाती घेऊन पाठपुरावा सुरू केला. यात येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करत सदर प्रस्तावाची पूर्तता केली. जल संपदा विभागा अंतर्गत हा प्रस्ताव बीड परळी औरंगाबाद आणी मंत्रालय येथील कार्यालयात जात असताना आ. संदीप क्षीरसागर यांनी प्रत्येक ठिकाणी पाठपुरावा केला.
दि.10.11.2021 रोजी महाराष्ट्र शासनाने जलसंपदा विभागाच्या उप सचिव जया पोतदार यांनी बिंदूदुसरा नदीवर शहरासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी निम पातळी बंधाऱ्या साठी 0.35 दलघमी पाणी विशेष बाब म्हणून देण्यास मान्यता देण्यात येत आहे असे कार्यकारी संचालक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबाद यांना कळवले आहे. सदर कामास
राज्याचे जलसंपदा मंत्री ना.जयंतराव पाटील यांनी या कामाला मंजुरी दिली याबद्दल सर्व बीडवासीयांच्या वतीने त्यांचे आ.संदीप क्षीरसागर यांनी मनापासून आभार मानले आहेत.