March 31, 2023

बहिणीला सोडवायला निघालेल्या भावावर काळाचा घाला !

बहिणीला सोडवायला निघालेल्या भावावर काळाचा घाला !

केज – एस टी महामंडळाच्या संपाचा फटका सामान्य प्रवाशांना बसत असल्याचे चित्र आहे.एकीकडे वाहक आणि चालक आत्महत्येसारखे पाऊल उचलत असताना दुचाकीवरून जाणाऱ्या प्रवाशांच्या अपघातात वाढ झाली आहे.भाऊबीजेला माहेरी आलेल्या बहिणीला संप असल्याने मोटारसायकल वरून सोडवायला निघालेल्या भावाचा अपघातात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.ही घटना केज तालुक्यात घडली.

अमोल सत्वधर हा माहेरी आलेल्या आपली बहीण अनुराधा फुलसुंदर हिला अन भाचा आदित्य या दोघांना सासरी सोडण्यासाठी निघाला होता . बुधवार दि १० नोव्हेंबर बुधवारी रोजी सकाळी ६ च्या दरम्यान केज-कळंब रोडवर साळेगाव येथे शाम तेलंग यांच्या शेताजवळच्या पुलावर एका बलॅनो गाडी क्रं. (एम एच २५/एएस ७५९०) ने मोटरसायकलला (एम एच ४४/वाय२१५३) समोरून धडक दिली. यात मोटरसायकलवरील अमोल सत्वधर आणि कार चालवीत असलेला युवक अमित जीवन बाराते (वय १७ वर्ष, रा. कळंब) हे दोघे जागीच ठार झाले. तर मोटरसायकलवरील सौ. अनुराधा विनोद फुलसुंदर आणि त्यांचा लहान मुलगा चि. आदित्य विनोद फुलसुंदर हे दोघे जखमी झाले आहेत.

हा अपघात एवढा भयंकर होता की कार प्रथम पुलाच्या कठड्याला धडकून मोटरसायकलला धडकली. त्यानंतर कार अनेक वेळा पलटी झाली. यामुळे कार चक्काचूर झाल्याचे दिसत आहे. जखमी अनुराधा विनोद फुलसुंदर आणि त्यांचा लहान मुलगा आदित्य विनोद फुलसुंदर याच्यावर अंबाजोगाई येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

एसटीचा संप सुरु आहे. यामुळे दिवाळीच्या भाऊबीजेला केज येथे आलेल्या बहिणीला तिच्या सासरी सोडण्यासाठी अमोल मोटरसायकलवरून बार्शी तालुक्याकडे जात होता. त्यात गाडी चालवण्याचे शिकत असलेल्या नवख्या चालकाने त्यांना धडक दिली. त्यातच या अभागी भावाचा जागीच मृत्यू झाला. तर ज्या गाडीने त्यांना धडक दिली ती गाडी कळंब येथील बाराते यांची असून आठ दिवसांपूर्वीच त्यांनी गाडी खरेदी केले होती. अमित बाराते हा त्याच्या दोन मित्रांना सोबत घेऊन गाडी शिकत होता. त्यात त्याचा भरधाव वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाला तर मोटरसायकलवरील अमोल सत्वधर याचाही जीव गेला.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click