बीड- मनमानी कारभार,सहकारी अधिकाऱ्यांचा सातत्याने अवमान,फिल्डवर न उतरता घरी किंवा कार्यालयात बसून केला जाणारा कारभार यामुळे वादग्रस्त बनलेल्या बीडच्या पोलीस अधीक्षक आर रामस्वामी यांच्या विरोधात आता पोलीस दलातच असंतोष निर्माण झाला आहे.तब्बल अकरा पोलीस कर्मचाऱ्यांनी अन्यायकारक बदलीच्या विरोधात मॅट मध्ये धाव घेतली आहे.त्यामुळे राजा च्या कारभाराला लगाम कोण घालणार असा सवाल केला जात आहे.
बीड जिल्ह्यात एकीकडे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले असताना दुसरीकडे पोलीस प्रशासनच या लोकांशी हात मिळवणी करत असल्याचे अनेक प्रसंगातून समोर आले आहे.बीड येथे पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाल्यापासून आर रामस्वामी हे वादग्रस्त ठरले आहेत .
काहीही करा पण माझ्या वाट्याच तेवढं बघा ही भूमिका घेऊन खुर्चीवर बसलेल्या राजा यांच्या कारभारामुळे पोलीस दलाची प्रतिमा धुळीला मिळाली आहे.बीड जिल्ह्यात वाळू,गांजा,मटका,जुगार,गुटखा या सारखे अवैध धंदे खुलेआम सुरू आहेत.याकडे ना राजा यांचं लक्ष आहे ना स्थानिक पोलीस किंवा स्थानिक गुन्हे शाखा.प्रत्येक जण फक्त लक्ष्मीदर्शन च्या मागे लागलेला आहे.
पोलीस अधीक्षक आर रामस्वामी यांनी नुकत्याच पोलीस दलात काही बदल्या केल्या.यामध्ये पती पत्नी एकत्रीकरण चे काही प्रस्ताव होते,मात्र एसपी नि त्याकडे दुर्लक्ष केल्याने तीन ते चार पोलीस मॅट मध्ये गेले आहेत.काही आजारपणामुळे बदली मागणाऱ्या पोलिसांना देखील एसपी नि ऐकून न घेता विनंती बदली न करता अन्याय केला.
या सगळ्या प्रकारामुळे अखेर तब्बल अकरा कर्मचाऱ्यांनी एसपी च्या या अन्यायाविरुद्ध थेट मॅट मध्ये धाव घेतली आहे.अशाप्रकारे आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध एवढ्या मोठ्या प्रमाणात न्यायालयात दाद मागण्याची ही बीड जिल्ह्याच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे.
या सगळ्या प्रकारानंतर आणि अवैध धंद्याना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पणे पाठीशी घालण्याचे उद्योग समोर आल्यानंतर तरी राजा यांना पालकमंत्री किंवा औरंगाबाद परिक्षेत्राचे आय जी वेसण घालणार का हाच खरा प्रश्न आहे.