September 30, 2022

जयभवानीच्या गळीत हंगामाचा शुभारंभ !

जयभवानीच्या गळीत हंगामाचा शुभारंभ !

गेवराई – स्पर्धेत टिकण्यासाठी
जयभवानी शिस्त आणि व्यावहारिकता जोपासत इतरांच्या तुलनेत ऊसाला सरस भाव देईल, कार्यक्षेत्रात नोंदणी झालेल्या सर्व ऊसाचे गाळप करण्यासाठी
जयभवानीची कार्यक्षमता वाढविली असल्याचे प्रतिपादन चेअरमन अमरसिंह पंडित यांनी केले. कारखान्याच्या ३९ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ करतांना ते बोलत होते.

दिपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर श्री क्षेत्र नारायण गडाचे मठाधिपती ह. भ. प. शिवाजी महाराज व माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्या शुभहस्ते गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला.

जयभवानी सहकारी साखर कारखान्याच्या ३९ व्या गाळप हंगामाचा शुभारंभ दिपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर ह.भ.प. शिवाजी महाराज व कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव पंडित यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर चेअरमन अमरसिंह पंडित, माजी चेअरमन जयसिंग पंडित, व्हाईस चेअरमन जगन्नाथराव शिंदे, संचालक भाऊसाहेब नाटकर, पाटीलबा मस्के, भास्करराव खरात, सुनील पाटील, श्रीराम आरगडे, संदीपान दातखिळ, आप्पासाहेब गव्हाणे, शेख मन्सुर, राजेंद्र वारंगे, जगन्नाथ दिवाण, भवानी बँकेचे अध्यक्ष बप्पासाहेब मोटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

प्रसंगी बोलतांना चेअरमन अमरसिंह पंडित म्हणाले की, अडचणीत असताना जयभवानी सुरु करतांना विरोधकांनी खुप अडचणी आणल्या, आपण मात्र संकटाला गाडून कारखाना सुरु केला. केवळ साखरेवर विसंबून न राहता आता ईतर उपपदार्थाचेही उत्पादन केले जाईल. भविष्यात विजनिर्मिती केली जाईल.

या प्रसंगी ह.भ.प. शिवाजी महाराज यांनी कारखान्याच्या उज्वल भविष्यासाठी आशीर्वादपर मनोगत व्यक्त केले. गोरगरीबांच्या कल्याणासाठी शिवाजीराव दादांनी सहकार आणि शिक्षण संस्था उभारल्या आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवूनच आता चेअरमन अमरसिंह पंडित काम करत असल्यामुळे जयभवानी कारखान्याला चांगले दिवस येऊन सर्वांचे कल्याण होणार असल्याचे सांगताना नगद नारायणाचे आशिर्वाद सदैव पंडित कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click