March 25, 2023

हेमंत क्षीरसागर यांच्या प्रश्नापुढे नागराध्यक्षांनी सभा गुंडाळली !

हेमंत क्षीरसागर यांच्या प्रश्नापुढे नागराध्यक्षांनी सभा गुंडाळली !

बीड – लेखा परीक्षण अहवालातील त्रुटी,नगर पालिकेतील भ्रष्टाचार या विषयावर पुतण्या तथा उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी पालिकेच्या सभेत काका तथा नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांना धारेवर धरले.निरुत्तर झालेल्या अध्यक्षांनी सभा गुंडाळत भ्रष्टाचारावर पांघरुनच घातले .

बीड नगर परिषदेचे सन 2017-18 चा लेखा परीक्षण अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आला. या लेखा परीक्षण अहवालामध्ये गंभीर स्वरूपाची अनियमितता, गैरव्यवहार व अक्षेप नोंदवलेलेल असतांना नगराध्यक्ष व पालिका प्रशासन भ्रष्टाचार दडपण्यासाठी त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आणुन देत अनियमितते बाबत उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी नगराध्यक्ष व पालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. चुकीच्या पद्धतीने समर्थन करणार्‍या नगराध्यक्ष व नगरसेवकांवरही कारवाई करण्याची मागणी करताच पालिकेची सर्वसाधारण सभा घाई गडबडीत गुंडाळण्यात आली आहे.
महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती औद्योगिक नगरी अधिनियम 1965 अन्वये परिशिष्टात नमुद केलेल्या कामकाजासाठी बीड नगर पालिकेची सर्वसाधारण सभा दि.3 नोव्हेंबर 2021 रोजी बोलवण्यात आली होती. या सभेच्या नोटीसमध्ये मुद्दा क्र.14 बीड नगर परिषद सन 2017-18 चे लेखा परीक्षण बाबतचा अहवाल माहितीस्तव या संदर्भात आर्थिक अनियमितता, गंभीर स्वरूपाचे परीक्षण यावर नगराध्यक्ष व पालिका प्रशासनाला उपनगराध्यक्षांनी चांगलेच धारेवर धरले. या विरूद्ध अक्षेपही नोंदवला. यावेळी नगरसेवक रमेश चव्हाण, नगरसेवक जैतुल्ला खान, नगरसेवक लक्ष्मण ईटकर, नगरसेवक सम्राट चव्हाण, नगरसेविका वैशाली विशाल घाडगे, नगरसेविका मिना बिभीषण लांडगे, नगरसेविका मोहम्मद फरजाना बेगम, नगरसेविका मोमीन खमरूनिसा बेगम यांनी आक्षेपाला अनुमोदन दिले. तर बाकीच्या सर्व नगरसेवकांनी अहवालाचे समर्थन केले. वास्तविक पाहता या लेखा परीक्षण अहवालात गंभीर निरीक्षण आढळून आलेले असतांना असे समर्थन करणे चुकीचे आहे. कलम 9 अ,ब,क प्रमाणे बँक खात्यात रक्कम शिल्लक नसतांना धनादेश देण्यात आले, एका निधीतून रक्कमा दुसर्‍या निधीत वर्ग करणे, वीज बील देयकांच्या अदाईबाबत अनियमितता, दैनंदीन वसुलीच्या रक्कमा बँकेत न भरता परस्पर वटवणे, कर्मचार्‍यांचे एलआयसीचे पैसे पगारातून कपात करण्यात आले परंतू एलआयसीला मिळालेले नसणे असे गंभीर स्वरूपाचे आरोप असतांना नगराध्यक्ष व ज्या-ज्या नगरसेवकांनी या ठरावाला समर्थन करून कायद्यामध्ये कसूर करण्याचे काम केले अशावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

सफाई कामगारांच्या प्रश्नावर नगराध्यक्ष निरूत्तर!
बीड न.प.कामगारांना लाड कमिटी व पागे कमिटीच्या शिफारशीनुसार अनुकंपा लागु करून नियुक्ती करणे बाबतचा विषय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. वास्तविक पाहता नगर परिषदेचा मुद्दा क्र.3 मध्ये एक हा विषय चुकीचा असल्याचे उनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी निदर्शनास आणून दिले. याचे कारण की, अनुकंपानुसार लाभ देणे 2016 पासून सुरू आहे तर पागे व लाड कमिटीच्या शिफारशीनुसार सफाई कामगारांना लाभ देण्या बाबतची कार्यवाही आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या प्रयत्नानंतर नगर विकास विभागाकडून अंतिम टप्प्यात आहे. केवळ बीड नव्हे तर महाराष्ट्रातील विविध विभागातील सफाई कामगारांना याचा फायदा होणार आहे असे सांगत हेमंत क्षीरसागर यांनी बीड शहरातील स्वच्छता कामगार, सफाई कामगार यांच्या प्रश्नाबाबत प्रश्न विचारल्यानंतर बीड नगर पालिकेचे नगराध्यक्ष निरूत्तर झाले. हा अनुभव सभागृहाने घेतला.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click