January 30, 2023

अडीच हजार कुटुंबाची दिवाळी झाली गोड !

अडीच हजार कुटुंबाची दिवाळी झाली गोड !

बीड – गेल्या पाच वर्षांपासून वंचित,निराधार,गोरगरीब लोकांची दिवाळी गोड करणाऱ्या राजयोग फाऊंडेशन आणि रोटरी क्लब मिडटाऊन ने यंदा तब्बल 2500 कुटुंबांना दिवाळी फराळ वाटप केले. या वंचित,गोरगरिबांच्या चेहऱ्यावर यावेळी समाधान दिसून येत होते.

राजयोग फाऊंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने याही वर्षी दीपावली सणानिमित्त गोरगरिबांच्या घरात आनंदोत्सव साजरा व्हावा यासाठी सारडा कॅपिटल च्या प्रांगणात सुमारे २५०० कुटुंबीयांना दिवाळी फराळ व दिवाळी सणाचे साहित्य गुरुवार दि.३ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वा. वाटप करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर ह.भ.प. महादेव महाराज यांच्यासह राजयोग फाउंडेशन चे संस्थापक दिलीप धुत, रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊन चे अध्यक्ष राजेश बंब, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संतोष सोहनी, रोटरी चे सचिव मोहम्मद आरेफ, क्रिडाई चे अध्यक्ष अतुल संघानी, सूर्यकांत महाजन, सुनील पारख, डॉ.बजाज, वैभव स्वामी, सुमंत रुईकर, शेखर महाद्वार, आत्माराम पवार, नगरसेवक शुभम धुत यांच्यासह राजयोग फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊन चे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
पुढे बोलताना ह.भ.प. महादेव महाराज म्हणाले आहे त्या धनाचा सदुपयोग करतो त्याला जीवनात काही कमी पडत नाही हे कार्य संत विभुतिंच्या विचारांवर चालणारे पुण्यकर्म आहे.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सूर्यकांत महाजन यांनी राजयोग फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊन च्या या समाजहितकारक दिवाळी फराळ वाटपाच्या उपक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली.
नगरसेवक शुभम धुत म्हणाले गोरगरिबांच्या दिवाळी आनंदाने साजरी व्हावी यासाठी राजयोग फाउंडेशन व रोटरी मागील ५ वर्षांपासून निस्वार्थ भावनेतून हे समाजसेवेचे कार्य सर्व सदस्य प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. व गतवर्षी कोरोना च्या काळात १२ आश्रमांसह, वंचित निराधार गरजवंतांच्या घरोघरी जाऊन दिवाळी फराळ व इतर साहित्य वाटप केले. आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने पुढे ही अविरतपणे हे कार्य सुरू ठेवण्यात येणार आहे.
रोटरी चे अध्यक्ष राजेश बंब म्हणाले की दिवाळी हा उत्सव आनंदाची उम्मेद घेऊन येणारा आहे, गोरगरिबांच्या आयुष्यात देखील हा आनंद सर्वांसोबत यावा यासाठीच फराळ वाटपाचा हा छोटासा प्रयत्न यामाध्यमातून करण्यात येत आहे, आभार रोटरी चे सचिव मोहम्मद आरेफ यांनी मांडले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नितीन गोपन यांनी केले.


दिव्यांग आणि निराधारांची ही दिवाळी झाली गोड,
निराधार गरजवंतांसोबतच दिव्यांगांना दिवाळी फराळ व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले १०० पेक्षा अधिक दिव्यांगांनी याचा लाभ घेऊन आनंदाश्रूने आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच जिल्ह्यातील सुमारे १३ वेगवेगळ्या वृद्धाश्रम, आश्रम, निराधार केंद्रातील आश्रय दात्यांना देखील लाभ देण्यात आला यामधे आपला परिवार-नेकनुर, सेवाश्रम-शिरुर, कामधेनु वृद्धाश्रम – कोळवाडी, ईन्फंट पाली, आदीवासी समीकरण, जिव्हाळा बेघर निवारा केंद्र, दत्तमंदिर अन्नछत्र, पसायदान सेवा प्रकल्प, आधार प्रकल्प गेवराई आदिंचा समावेश होता.
स्मशानभूमीत ही दिवाळी केली गोड, बीड शहरातील मोंढा रोड येथील अमरधाम व भगवाबाबा प्रतिष्ठान जवळील वैकुंठधाम स्मशानभूमीची देखभाल करणाऱ्या कुटुंबांना विशेष बाब म्हणुन दिवाळी फराळ व इतर साहित्य देण्यात आले. त्या कुटुंबात देखील यामुळे दिवाळी आनंदाची झाली तसेच हत्तीखाना येथील महानुभाव पथं कृष्ण मंदिर येथील पुजारी व मंदिराची देखभाल करणार्‍या कुटुंबांना फराळ साहीत्याचे वाटप करण्यात आले.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click