आष्टी – इनामी जमिनी पुढारी अन बिल्डर लोकांशी संगनमत करून कवडीमोल भावाने विक्री करत कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या बडतर्फ उपजिल्हाधिकारी नरहरी शेळके याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे,अगोदरच दोन प्रकरणात जेलची हवा खाणाऱ्या शेळकेच्या अडचणी यामुळे वाढल्या आहेत .
आष्टी तालुक्यातील देवी निमगाव येथील तब्बल 15 हेक्टर 98 आर जमीन ही वक्फ बोर्डाची असताना 2018 मध्ये भुसुधार चे उपजिल्हाधिकारी असलेल्या नरहरी शेळके याने स्थानिक लोकांशी संगनमत करून कवडीमोल भावाने विक्री केली.
कोणत्याही प्रकारे मदतमाज असलेल्या जमिनीची खरेदी विक्री होऊ शकतं नाही.हे माहीत असतानाही शेळके याने देवी निमगाव येथील वक्फ बोर्डाची जमीन ख्वाजामिया सय्यद या व्यक्तीला विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला .या प्रकरणी जिल्हा वक्फ अधिकारी यांनी अंभोरा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून 1 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल झाला आहे.
उपजिल्हाधिकारी नरहरी शेळके याच्यावर यापूर्वी च देवस्थान अन मस्जिद च्या जमिनीची विक्री केल्याप्रकरणी गुन्हे दाखल होऊन जेलची हवा खायची वेळ आली आहे.आता यात नव्याने गुन्हा दाखल झाल्याने शेळके यांच्या अडचणी वाढणार आहेत.