बीड – शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत. बीड नगर परिषद आपल्या ताब्यात नसल्यामुळे विकासाच्या या मार्गात काही खड्डे येत आहेत. मागील निवडणूकीच्या काळात विकासाचा दिलेला शब्द पुर्ण करून या भागातील विविध विकास कामे सुरू होत आहेत. शहरातील रस्ते,नाल्या,पथदिवे,उद्याने आणि पाणी प्रश्न, लाईट व्यवस्था अशा मुलभूत सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देईल. शहरातील नागरिकांना मुलभूत सुविधांपासून वंचित ठेवणार्या नगर पालिकेतील सत्ताधार्यांना घरी बसवण्याची जबाबदारी सुजान नागरिकांनी घ्यावी. नगर पालिका पुर्ण ताकदीने ताब्यात द्या, बीड व्हिजनच्या माध्यमातून विकास काय असतो तो जनते समोर मांडू असे प्रतिपादन आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी केले. ते मोमीनपुरा भागातील विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
बीड शहरातील मोमीनपुरा भागातील शादी खाना व रस्ता नाली कामाचे उद्घाटन आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे, जावेदभाई कुरेशी, हाजीभाई, हुसेन भाई, मसीभाई, चाँद कुरेशी, मुजीबभाई कुरेशी, हमीदभाई पाले, वाजेदभाई, सादेक अंबानी, रफिकसेठ कुरेशी, जावेदसेठ, जैतुल्ला खान, सत्तार कुरेशी, एजाज भाई, नजर चाचू, नजर खान, खुर्शीद आलम, सचिन जाधव यांच्यासह या भागातील आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलत असतांना आ.संदिप भैय्या क्षीरसागर म्हणाले की, विकासाचा वादा पुर्ण करणारच परंतू जनतेला विकासापासून वंचित ठेवणार्या पालिकेतील सत्ताधार्यांना घरी बसवण्याची जबाबदारी जनतेनेच हाती घ्यावी. गेल्या 25 वर्षाच्या कार्यकाळात जो विकास झाला नाही तो विकास आम्ही करून दाखवू. या भागातील जनतेचे आशिवार्द आणि दुवाँ अशीच कायम सोबत राहिल्यास कोणती शक्ती रोखू शकणार नाही. विकास कामात किती आडकाटे आले तरी देखिल विकासाचे प्रश्न प्राधान्याने सोडवेल असे आशिर्वाद कायम राहू द्या असे आवाहनही त्यांनी केले.