बीड- गेल्या दीड महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बीड मतदारसंघात शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते,याबाबत शासन दरबारी पाठपुरावा केल्यानंतर 94 कोटी रुपये मदत प्राप्त झाली असून दिवाळीपूर्वी ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याच्या आ संदिप क्षीरसागर यांच्या सूचना तहसील प्रशासनाने मनावर घेतल्या आहेत.त्यानुसार शनिवारी मदत खात्यावर जमा करण्यास सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे .
बीड जिल्ह्यात सप्टेंबर व ऑक्टोंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये बीड मतदार संघातील बीड आणि शिरूर कासार तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने शेतकर्यांच्या पीकांचे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त भागाची आ.संदिप क्षीरसागर यांनी पालकमंत्री तथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या समवेत पाहणी करत नुकसानग्रस्त शेतकर्यांना भरीव मदत मिळावी अशी मागणी केली होती. आ.संदिप क्षीरसागर यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून शासनाकडेही पाठपुरावा केला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात नुकसानग्रस्त शेतकर्यांना 94 कोटी रूपयांची मदत जाहिर झाली असून दिवाळीपुर्वी शेतकर्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याची सुरूवात आ.संदिप क्षीरसागर यांच्या सूचनेवरून तहसील प्रशासनाने केली आहे.
बीड मतदार संघातील बीड आणि शिरूर कासार तालुक्यात मोठ्या प्रमाणात झालेल्यापावसामुळे अनेक महसूली मंडळातील शेतातील पीके पुर्णपणे वाया गेली. या नुकसानग्रस्त शेतकर्यांना भरीव मदत मिळावी यासाठी आ.संदिप क्षीरसागरांनी बीडचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे व शासनाकडे मागणी केली. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यासाठी अतिवृष्टीमुळे शेतकर्यांना नुकसान भरपाईपोटी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला. त्याबद्दलही आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी पालकमंत्री तथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांचेही आभार मानले आहेत. दिवाळीच्या अगोदर सर्व शेतकर्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली पाहिजे. यासाठी तहसीलची यंत्रणा कामाला लावून आ.संदिप क्षीरसागर शेतकर्यांना मदत मिळून देण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे चित्र दिसून आले.