December 10, 2022

टाकळगाव च्या बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये होणार रूपांतर !

टाकळगाव च्या बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये होणार रूपांतर !

गेवराई – सिंदफणा नदीवरील टाकळगाव बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रुपांतर करण्याच्या कामास महाविकास आघाडी सरकारने मान्यता दिली आहे. यामुळे तब्बल 250 हेक्टर जमीन ओलिताखाली येऊन त्याचा पंधरा ते वीस गावातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे .

या बॅरेजमुळे सुमारे २५० हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येणार असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. कामाच्या सर्व्हेक्षण व अन्वेषणाचे काम तात्काळ सुरु करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाने दिल्या आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आ.अमरसिंह पंडित यांनी सिंदफणा नदीवरील टाकळगाव को.प.बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रुपांतर करण्याची मागणी सातत्याने शासनाकडे केली होती. यासाठी त्यांनी विधान परिषदेमध्ये याविषयी चर्चा घडवून आणली होती.

सन २०१६ पासून त्यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर आज यश आले असून महाविकास आघाडी सरकारने सुमारे १५० कोटी रुपयांच्या टाकळगाव बॅरेजच्या कामास मंजुरी दिली आहे. यापूर्वीही अमरसिंह पंडित यांच्या प्रयत्नांमुळे सिंदफणा नदीवर सिरसमार्ग बॅरेजचे काम पूर्ण झाले आहे. टाकळगाव बॅरेजमुळे सिरसमार्ग पासून टाकळगाव पर्यंत सुमारे १२ किमी नदीपात्रात पाणी साठणार असून २५० हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येणार आहे. २.२२ द.ल.घ.मी. साठवण क्षमतेच्या या प्रकल्पामुळे टाकळगाव, पिंपळगाव कानडा, हिरापूर, पारगाव जप्ती, नांदुर हवेली, हिंगणी हवेली, खामगाव, पेंडगाव, माळापूरी, आहेरवाहेगाव, पाडळसिंगी आदी गावातील शेतकऱ्यांना या बॅरेजचा लाभ होणार आहे. जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांच्या बीड जिल्हा दौऱ्यानंतर त्यांनी तात्काळ या प्रकल्पाला मंजुरी देवून गुरुवार, दि.२१ रोजी अमरसिंह पंडित यांना प्रकल्पाच्या मान्यतेचे पत्र दिले. जलसंपदा विभागाच्या मान्यतेने पहिल्या टप्प्यात बॅरेजच्या सर्व्हेक्षण आणि अन्वेषणाच्या कामास तातडीने सुरुवात होणार असून त्यानंतर पुढील कार्यवाही होणार आहे. सुमारे चार महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज आहे. माजी आ.अमरसिंह पंडित यांनी उपमुख्यमंत्री ना.अजित पवार, जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील, पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

सततच्या दुष्काळी परिस्थितीला तोंड देणाऱ्या भागात मोठा सिंचन प्रकल्प मंजुर झाल्यामुळे या भागातील शेतकरी आनंद व्यक्त करत आहेत.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click