November 30, 2021

लाटेने रस्त्याची वाट लावली !

लाटेने रस्त्याची वाट लावली !

बीड – आदर्श नगर,शिक्षक कॉलनी ते राजीव गांधी चौक भागाला बीड शहराशी जोडणाऱ्या रस्त्याचे भाग्य उजळले अन सिमेंट रोड झाला मात्र हे काम करणाऱ्या लाटे नावाच्या गुत्तेदाराने चाबरेपणा केला अन रस्त्याची वाट लावली .सिमेंट रस्ता कसा नसावा हे पहायचे असेल तर तज्ज्ञांनी या रस्त्याला भेट द्यावी .नगर पालिका प्रशासन अन नगराध्यक्ष खिशात असल्याने या गुत्तेदारावर कारवाई होण्याची शक्यता देखील नाही हे विशेष .

बीड शहरात विकास कामे केल्याच्या नावाखाली नगर पालिकेकडून सारडा असोत की क्षीरसागर अथवा लाटे असे मोठमोठे गुत्तेदार पोसण्याचे काम केले जात आहे.सारडा नावाच्या गुत्तेदारासोबत पार्टनरशिप असल्याप्रमाणे अधिकारी असो की पदाधिकारी सगळेच त्याच्यावर मेहरबानी दाखवतात .

आता हाच प्रकार क्षीरसागर आणि लाटे यांच्याबाबत सुरू आहे.बीड शहरातील बहुतांश हॉस्पिटल असलेल्या आदर्श नगर भागात गेल्या कित्येक वर्षांपासून रस्ताच नव्हता . दोन वर्षांपूर्वी रस्ता मंजूर झाला मात्र प्रत्यक्षात काम सुरू झाले उशिराने.

हे काम करणाऱ्या गुत्तेदारावर नगर पालिकेचे सीईओ, नगराध्यक्ष, रोजंदारी वर काम करणारे इंजिनिअर यांनी मोठी मेहरबानी दाखवली .त्यामुळे या गुत्तेदाराने रस्ता असतसाच केला.शिक्षक कॉलनी कडून राजीव गांधी चौकात जाताना रस्ता मध्येच सोडल्याने दुचाकी चारचाकी तेथे आदळून अपघात होत आहेत.

बीएसएनएल ऑफिस असो की बारकुल हॉस्पिटल कडे जाण्याचा मार्ग या ठिकाणी कमी अधिक सिमेंट टाकल्याने चढ उतार झाले आहेत,पेव्हर ब्लॉक लावले त्यादिवशीच निघूनगेले आहेत .

नाल्या खुजा अन रस्ता वर तर काही ठिकाणी रस्ता खाली अन नाली वर असे प्रकार झाले आहेत.काम करताना जर त्याठिकाणी इंजिनिअर किंवा तज्ञ असतील तर चूका कमी होतात मात्र नगर पालिकेत गुत्तेदारांचे लाड पुरवण्याचे काम होत असल्याने त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.अशा चुकीची कामे करणाऱ्या लाटे वर कारवाई करण्याची मागणी होत आहे .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *