November 30, 2021

विजयादशमी निमित्ताने आर्यन कुटेची जगाला अनोखी भेट !

विजयादशमी निमित्ताने आर्यन कुटेची जगाला अनोखी भेट !

बीड – तिरुमला उद्योग समूहाचे प्रमुख सुरेश कुटे व अर्चना सुरेश कुटे यांचे चिरंजीव आर्यन सुरेश कुटे यांच्या ओएओ इंडिया या कंपनीच्या वतीने राईज ऑफ वॉर गेमचे विजयादशमीच्या मुहूर्तावर बीड येथून जगभरात शानदार कार्यक्रमात लॉन्चिग करण्यात आले. यापूर्वी ओएओ इंडियाचे दोन गेम लॉन्च झालेले आहेत. कृष्णा माखन मस्ती व इंडियन फ़ूड बाश या गेमला नागरिकांनी उंदड प्रतिसाद दिलेला आहे.आता ओएओ इंडियाच्या माध्यमातून तिसरा गेम ‘राईज ऑफ वॉर’ हा जागतिक पातळीवर उपलब्ध करून दिलेला आहे.

एका शानदार कार्यक्रमात तिरुमला उद्योग समूहाच्या मॅनेजिंग डायरेक्टर अर्चनाताई सुरेश कुटे व आर्यन सुरेश कुटे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते स्क्रीनवर कळ दाबून हा गेम ओएओ कंपनीच्या वतीने लॉन्च झाला. यावेळी बोलताना कार्यक्रमात कुटे ग्रुप उद्योग समूहाच्या मॅनेजिंग डायरेक्टर अर्चनाताई सुरेश कुटे म्हणाल्या की, आर्यन सुरेश कुटे याचे यापूर्वी दोन गेमचे लॉन्िंचग झालेले आहेत. ‘कृष्णा माखन मस्ती’ या गेमला एक लाखांपेक्षा अधिक जणांनी प्रतिसाद देत डाउनलोड केलेले आहे. आता हा तिसरा गेम ओ.ए.ओ इंडिया या आयटी कंपनीच्या वतीने वर्ल्डमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. यापूर्वी थायलंड मध्ये हा गेम लॉन्च करण्यात आला होता. त्यास भरभरून सपोर्ट मिळाला आहे. आता या गेमचे लॉंन्चिंग ही जगभरात लाईव्ह होत आहे. या गेमला ही सर्वांनी सपोर्ट करावे व बीडच्या सुपुत्राने केलेल्या प्रयत्नास साथ द्यावी. आर्यनने जेंव्हा कंपनीच्या माध्यमातून गेम तयार करण्याची संकल्पना मांडली तेंव्हा मुलांच्या संकल्पना ही सत्यात उतरण्यासाठी कंपनी स्थापन केली. आमचे आदरनिय सुरेश कुटे सर यांनी त्याला सपोर्ट केला. हा गेम तयार करण्यासाठी त्याच्या टीमला एक वर्षाचा काळ लागला व वेगळ्या संकल्पना घेऊन हा गेम तयार झाला आहे. त्यामुळे आजच्या विजयादशमीला हा गेम आपल्यासमोर आणता आला याचा आनंद असल्याचे अर्चनाताई कुटे म्हणाल्या. आर्यनला त्यांचे वडील सुरेशजी कुटे,आजी राधाकाकू, यांच्यासह कुटे ग्रुप परिवाराचे नेहमीच मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले आहे. आजचा हा गेम सर्वांनी डाऊनलोड करून खेळून त्याचा आनंद घ्यावा असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.

तर लॉंन्चिंग प्रसंगी आर्यन सुरेश कुटे म्हणाले की, दररोजच्या धकाधकीत,कामाच्या व्यापात वेगवेगळ्या टेंशनमध्ये गेमच्या माध्यमातून आपण दोन घटका करमणूक करू शकतो का? तसेच टेंशन घालवू शकतो का ? असा विचार मनात आला आणि त्या भूमिकेतून आम्ही ओएओ कंपनीच्या माध्यमातून लहानापासून ते मोठ्या माणसापर्यंत अबालवृद्ध खेळू शकतील असे गेम तयार केले. सुरुवातीला ‘कृष्णा माखन मस्ती’ हा बबल गेम काढून आता ‘राईज ऑफ वॉर’ हा कार्ड गेम आम्ही आज जगामध्ये लॉन्च केला आहे. या गेम मधील स्टोरीमध्ये सस्पेंस आहे, त्यामुळे तो गेम खेळताना तुम्हाला समजेल, हा गेम खेळावा असे आवाहन आर्यन कुटे यांनी केले.

आमच्या प्रत्येक व्यावसायात बीडकरांचे मोठे योगदान आहे. आर्यनने अवघ्या दहा वर्षात स्वत:ची कंपनी स्थापन केली आहे. विजयादशमीच्या मुहूर्तावर या कंपनीच्या वतीने तिसरा गेम लॉन्च होत आहे. बीडमधून जागतिक स्तरावर या गेमचे लॉन्च करण्यात आले असून बिडकरांनी त्याच्या पाठीशी उभे राहून आशीर्वादरुपी आर्यनला पाठबळ द्यावे.

लहान असताना आई बाबा गेम खेळण्यास विरोध करत होते, मात्र गेमच्या माध्यमातून लहानांपासून मोठ्यांनाही आनंद घेता येतो, त्यादृष्टीनेच माझ्या कंपनीच्या वतीने विविध गेमची निर्मिती केली जाते. आज लॉन्चिंग झालेला गेम संपूर्ण जगात जाणार आहे आपणही हा गेम डाऊनलोड करून आनंद घ्यावा.

कुटे ग्रुपचे संस्थापक आमचे आधारस्तंभ स्व. ज्ञानोबाराव (अण्णा) कुटे यांनी दाखवून दिलेल्या मार्गानेच आमची वाटचाल सुरू आहे. आज ते आमच्यात नाहीत मात्र त्यांची पदोपदी आठवण आणि जाणीव आम्हाला होत आहे. त्यांची आशीर्वादरुपी शक्ती आमच्या पाठीशी राहणार आहे. हे सांगताना अर्चनाताईंना गहिवरून आले.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *