October 17, 2021

इन्फोसिस देणार तब्बल 45 हजार नोकऱ्या !

इन्फोसिस देणार तब्बल 45 हजार नोकऱ्या !

मुंबई – देशातील आघाडीचे उद्योजक नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली घोडदोड करणाऱ्या इन्फोसिस या कंपनीत तब्बल 45 हजार ग्रॅज्युएट तरुण तरुणींना नोकरीची संधी दिली जाणार आहे.इन्फोसिस च्या नफ्यात अकरा टाक्यांची वाढ झाल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे .

बाजारातील सर्व क्षमतेचा लाभ घेण्यासाठी आम्ही आमच्या कॉलेज ग्रॅज्युएट हायरिंग प्रोग्रॉमला या वर्षी वाढवून 45,000 पर्यंत घेऊन जाणार आहोत. याव्यतिरिक्त, आम्ही आमच्या कर्मचार्‍यांच्या गरजा पूर्ण करणे सुरू ठेवणार आहोत, ज्यात हेल्थ आणि वेलनेसचे उपाय, रिस्किलिंग प्रोग्रॉम आणि करिअर वाढीच्या संधी यांचा समावेश आहे.”


इन्फोसिसने बुधवारी चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे (2021-22) आर्थिक परिणाम जाहीर केले. चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबरमध्ये संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 11.9 टक्क्यांनी वाढून 5,421 कोटी रुपये झाला. यासह, कंपनीने मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 4,845 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता.

याचबरोबर, शेअर बाजारांना पाठवलेल्या माहितीमध्ये कंपनीने म्हटले आहे की, तिमाही दरम्यान कंपनीची कमाई 20.5 टक्क्यांनी वाढून 29,602 कोटी रुपये झाली आहे, जी एक वर्षा आधी याच तिमाहीत 24,570 कोटी रुपये होती.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *